See the comparisons of old and new tax scheme
( या मध्ये फक्त तुमचं वार्षिक उत्पन्न टाका जुन्या आणि नवीन टैक्स मधला फरक दिसेल )
नवीन करप्रणालीने बऱ्याच जणांचा गोंधळ झालेला दिसतोय, १२ लाखावर टॅक्स लागणार मग हे ४ लाखाच्या वर ५ % आणि असे टॅक्स स्लॅब का दिले आहेत? असं बरेच जण विचारतात. तुमचा देखील गोंधळ झाला असेल तर पूर्ण वाचा, समजून घ्या.
निव्वळ करपात्र उत्पन्न (Net Taxable Income) 12 लाख रुपयांपर्यंत असेल तर कोणताही कर लागू होणार नाही. पूर्वी 87A अंतर्गत करसवलतीची मर्यादा ₹७ लाख होती, ती आता ₹१२ लाख करण्यात आली आहे. तसेच, या सवलतीची कमाल रक्कम ₹२५,००० वरून ₹६०,००० करण्यात आली आहे.
१५ लाख कमावणाऱ्याला केवळ ३ लाखावर कर भरावा लागेल का?
:- नाही!
जर तुमचे उत्पन्न ₹१२ लाखांपेक्षा जरी १ रुपया जास्त असेल, तर तुम्हाला संपूर्ण उत्पन्नावर करप्रणालीनुसार कर भरावा लागेल. त्यासाठी खालील टॅक्स स्लॅब आणू उदाहरण बघा.
नवीन करस्लॅब:
₹० ते ₹४ लाख: शून्य कर
₹४ लाख ते ₹८ लाख: ५% कर
₹८ लाख ते ₹१२ लाख: १०% कर
₹१२ लाख ते ₹१६ लाख: १५% कर
₹१६ लाख ते ₹२० लाख: २०% कर
₹२० लाख ते ₹२४ लाख: २५% कर
₹२४ लाखांपेक्षा जास्त: ३०% कर
ही करसवलत फक्त पगार, व्यवसाय इत्यादी सामान्य उत्पन्नासाठी लागू असेल.
भांडवली नफा (Capital Gains) किंवा इतर विशेष उत्पन्नासाठी ही सवलत उपलब्ध नाही.
उदा. जर तुमचं इन्कम 13,00,000 असेल तर
0–4 lakhs: 0% → ₹0
4–8 lakhs: 5% on ₹4,00,000 → ₹20,000
8–12 lakhs: 10% on ₹4,00,000 → ₹40,000
12–13 lakhs: 15% on ₹1,00,000 → ₹15,000
Total Tax Payable = ₹75,000
अजून एक पगरावर 75,000 डीडक्शन मिळतं, त्यामुळे 12,75,000 पर्यंत टॅक्स लागणार नाही