google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: November 2022
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Tuesday, 29 November 2022

चंपा षष्ठी व्रत, व्रताची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

 पंचांगानुसार, सोमवार, 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 01.35 वाजता मंगळ मासातील शुक्ल पक्षात षष्ठी तिथीला सुरू होत आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.04 वाजता संपेल.अशा स्थितीत उदयतिथीनुसार मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी चंपा षष्ठीचे व्रत केले जाणार आहे   

 
थोडं पण कामाचं
  • या दिवशी भगवान शंकराच्या मार्कंडेय रुपाची पूजा केली जाते.
  • यावर्षी चंपा षष्ठी मंगळवारी 29 नोव्हेंबरला येत आहे.
  • महाराष्ट्रातील भाविक या दिवशी भगवान शंकराचा अवतार खंडोबाची पूजा करतात.








🌼जय मल्हार🌼

बोल खंडेराव महाराज की जय॥
सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय म मल्हार॥
हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥
भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥
सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥
निळा घोडा॥ पाई तोडा॥
कमर करगोटा ॥ बेंबी हिरा॥
गळयात कंठी॥ मोहन माळा॥
ङोईवर शेला॥ अंगावर शाल॥
सदा हिलाल॥ जेजुरी जाई॥
शिकार खेळी॥ म्हाळसा सुंदरी॥
आरती करी॥ देवा ओवाळी ॥
नाना परी॥ देवाचा श्रृंगार ॥
कोठ लागो शिखरा॥ खंडेरायाचा खंडका ॥
भंडाऱ्याचा भडका॥ बोल सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय मल्हार||