सेतू अभ्यास २०२३-२४ ची शालेय स्तरावरून प्रभावी अंमलबजावणीसाठी
सेतू अभ्यास 2023 24 चे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल :-
१) सेतू अभ्यास हा 20 दिवसांचा शालेय कामकाजाचे दिवस धरून असून, यामध्ये दिवस निहाय कृतीपत्रिका देण्यात आलेले आहेत तसेच, तो अभ्यास मराठी आणि उर्दू माध्यमांसाठी तयार करून छापील स्वरूपात देण्यात आलेला आहे.
२) इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित आणि इंग्रजी तर, इयत्ता सहावी ते दहावी साठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे,
३) सदर सेतू अभ्यास हा इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून, मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या अध्ययन निष्पत्ती वर क्षमतांवर आधारित आहे.
४) सादर सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणी विषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यास पुस्तके च्या सुरुवातीला देण्यात आलेले आहेत.
५) सदर सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थ्यांचे केंद्रित व कृती केंद्र तसेच अध्ययन निष्पत्ती व क्षमतांवर आधारित आहेत विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयं अध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे तसेच अधिक संबोध स्पष्ट ते करिता काही विषयांनी ही साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेले आहेत.
६) सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवस निहाय सोडवतील या प्रकाराने नियोजन देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षकांनी सदस्यता अभ्यास विद्यार्थ्यांकडून सोडून घेणे आवश्यक आहे.
७) पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी चा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त सेतू अभ्यासाची पूर्व चाचणी ही दिनांक 27 जून 2023 पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच उत्तर चाचणी दिनांक 24 जुलै 2023 पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
संकेत स्थळ : https://www.maa.ac.in/
१) पूर्व चाचणी = दिनांक 30 जून ते 3 जुलै 2023.
2) 20 दिवसांचा सेतू अभ्यास= दिनांक 4 जुलै ते 26 जुलै 2023 .
३) उत्तर चाचणी= दिनांक 27 ते 31 जुलै 2023.
प्रश्नपत्रिका खालील लिंक / बटनावरून Download करणे.