सूर्यग्रहण म्हणजे जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये येतो, तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल खूप पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आहेत.
सूर्यग्रहण हे अमावस्येच्या दिवशीच दिसते. पण सर्व अमावस्यांना सूर्यग्रहण दिसत नाही. कारण सर्व अमावस्यांना पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा एका रेषेत येत नाहीत. पण जेव्हा अमावस्येकडे पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा एका रेषेत येतात तेव्हाच सूर्यग्रहण होते.
सूर्यग्रहणाचे प्रकार (Types of Solar Eclipse):-
सूर्यग्रहणाचे तीन मुख्य प्रकार आहेत:-
- खग्रास सूर्यग्रहण (Total Solar Eclipse): जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपतो तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होते.
- खंडग्रास सूर्यग्रहण (Partial Solar Eclipse): जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या पाठीमागे जातो तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण दिसते.
- कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse): जेव्हा चंद्र पृथ्वीपासून सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. अशाप्रकारे चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही त्यामुळे सूर्याच्या बाह्य किरणाची अंगठी दिसते.
सूर्यग्रहण पाहताना काय घ्यावी काळजी (Safety Precautions)-
सूर्यग्रहण हा उघड्या म्हणजेच साध्या डोळांनी पाहणे खूप धोकादायक आहे. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास तयार केलेले फिल्टर असलेले चष्मे (eclipse glasses) वापरावेत. एवढेच नाही तर वेल्डिंग शेड नंबर 14 चे ग्लासेस (welding shade 14 glasses) देखील सूर्यग्रहण पाहण्यासाठी वापरता येतात.