google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: June 2017
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Wednesday, 28 June 2017

Staff Portal

खाजगी अनुदानित व्यवस्थापनाच्या शाळांसाठी सूचना -

१. संच मान्यता सन २०१६-१७ नुसार राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील अनुदानित पदावरील मान्यताप्राप्त अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन online करण्यासंदर्भात मा.आयुक्त शिक्षण यांच्या दिनांक ३१ मार्च, २०१७ च्या परिपत्रकान्वये सविस्तर कार्यपद्धती व वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार अतिरिक्त शिक्षकाची वैयक्तिक माहिती Staff Portal वर भरलेल्या माहितीवरून घेण्यात येणार आहे.
२. अतिरिक्त शिक्षकाची संस्थेतील अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकाची सर्व माहिती Staff Portal भरलेली असणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी माहिती भरलेली असल्यास सदरची माहिती Update असणे आवश्यक आहे. तरी त्याप्रमाणे staff portal वर सदर अतिरिक्त शिक्षकाची माहिती update करून केंद्रप्रमुख यांच्याकडून verify करावी. अशा अतिरिक्त शिक्षकाची माहिती update व verify करण्यासाठी सदर शाळेला Staff Portal ला login उपलब्ध करून दिलेले आहेत. अतिरिक्त शिक्षकाची नावे Staff Portal ला भरलेली नसल्यास समायोजन पोर्टलसाठी EO लॉगिनवर त्या शिक्षकाची नावे दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
३. सर्व अनुदानित शाळेतील सर्व शिक्षकांची नावे staff portal वर भरलेली आहेत किंवा नाही याची खात्री करून माहिती update करावी. एखाद्या शिक्षकाचे नाव नव्याने Add करावायाचे असल्यास त्यासाठी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांच्या login वर New Entry चे Form उपलब्ध केलेले आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळांतील सर्व शिक्षकांसाठी सूचना -
१. शासन आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांची जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली ही staff portal मध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे केली जाणार आहे.
२. शिक्षकाची सर्व माहिती Staff Portal वर भरलेली असणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी माहिती भरलेली असल्यास सदरची माहिती Update व केंद्रप्रमुख यांनी Verify केलेली असणे आवश्यक आहे. तरी शाळेने त्याप्रमाणे तपासून staff portal वर सर्व शिक्षकाची माहिती update करून संबंधित केंद्रप्रमुख यांच्याकडून verify करावी.

जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांना माहिती भरण्यासाठी विभागनिहाय वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे. तसेच विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांमधील प्राथमिक शिक्षक या कालावधीत आपले आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज भरू शकतील.

तसेच विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांमधील प्राथमिक शिक्षक या कालावधीत आपले आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज भरू शकतील.


अ.क्र विभाग जिल्हा परिषद ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक
1. औरंगाबाद औरंगाबाद/जालना/परभणी/हिंगोली/बीड दि.23 मे ते 24 मे २०१७
2. लातूर लातूर /उस्मानाबाद/ नांदेड दि.23 मे ते 24 मे २०१७
3. अमरावती अमरावती/अकोला/वाशिम/बुलढाणा/ यवतमाळ दि.23 मे ते 24 मे २०१७
४. नागपूर नागपूर /वर्धा/चंद्रपूर/ भंडारा/ गोंदिया/ गडचिरोली दि.23 मे ते 24 मे २०१७
5. कोल्हापूर कोल्हापूर/सातारा/सांगली/रत्नागिरी/ सिंधुदूर्ग दि.23 मे ते 24 मे २०१७
6. पुणे पुणे/सोलापूर/अहमदनगर दि.23 मे ते 24 मे २०१७
7. मुंबई मुंबई/पालघर/ठाणे/रायगड दि.23 मे ते 24 मे २०१७

New Forms in Staff Portal for All Private Aided and Z.P.Schools -
१.
Map Teacher with Multi Medium - ज्या शाळेमध्ये अध्यापनाची बहू माध्यमे (Multi Medium School) आहेत त्या शाळांनी त्यांच्या शाळेतील शिक्षक कोणत्या माध्यमासाठी शिकवीत आहेत त्या सर्व शिक्षकांची माहिती Staff Portal वर select करणे compulsory आहे. अशा बहू माध्यमाच्या शाळांनी सदरची माहिती staff portal वर update करावी त्याशिवाय सदर शाळांतील अतिरिक्त शिक्षकांची नावे Staff Portal ला भरलेली नसल्यास समायोजन पोर्टलसाठी EO लॉगिन वर त्या शिक्षकाची नावे दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
२.
End of Service - एखादा शिक्षक staff portal वर माहिती भरल्यानंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाला असेल किंवा अन्य कारणामुळे त्याची सेवा समाप्त (बडतर्फ/मयत/स्वेच्छा सेवानिवृत्ती/राजीनामा इ. कारण) झालेली असल्यास अशा शिक्षकांची नोंद शाळेने या form मध्ये करावयाची आहे. व ती केंद्रप्रमुख यांना Forward करून Verify करावयाची आहे.
३.
Detach/Attach of Teaching Staff - एखादा शिक्षक Staff Portal वर माहिती भरताना जुन्या शाळेत होता व तो शिक्षक आज रोजी बदलीने/पदोन्नतीने नवीन शाळेत रुजू झालेला आहे असा शिक्षक जुन्या शाळेने Detach करावयाचा आहे. सदर शिक्षक शाळेने Detach केल्यानंतर तो शिक्षक वरिष्ठ authority यांच्या लॉगिनवरून confirm करावयाचा आहे. त्यानंतर नवीन शाळेला असा शिक्षक Attach करण्यासाठी शाळेच्या लॉगिनवर उपलब्ध होईल. सदर शिक्षक शाळेने attach करावा. त्यानंतर पुन्हा नवीन शाळेच्या संबंधित वरिष्ठ authority कडून त्याला approve करणे आवश्यक आहे.

School Type - Authority to be Confirm
Z P. school - BEO Login
Private Aided School - EO login

Monday, 26 June 2017

Staff portal

    *🎭яιтεsн ηιℓεωαя🎭*
         *- αкσℓα (ⓐⓚⓞⓣ)*
     ┄─┅━━♍💲🅿━━┅─┄
      ╭════════════╮
       ▌🌈 *स्टाफ पोर्टल*🌈  ▌
      ╰════════════╯
═════════════════
         नमस्कार मित्रांनो,
सध्या आपण स्टाफ पोर्टल वर माहिती भरत आहोत, किंवा update करत आहोत.

               ट्रान्सफर पोर्टल वर माहिती भरण्यासाठी(सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे बदलीचा फॉर्म भरण्यासाठी) स्टाफ पोर्टल वरील माहिती अचूक असणे आवश्यक आहे.
           त्या साठी महत्त्वाचे दिनांक कोणते असावेत याची माहिती देत आहे.

*⚜Date of birth -*
आपली जन्म तारीख व्यवस्थित तपासून घ्यावी. बरोबर असल्याची खात्री करावी. जर तारीख चुकीची असेल तर ती तारीख beo लॉगिन ला फॉरवर्ड करून आपल्या जन्म तारखेचा पुरावा देऊन दुरुस्त करून घ्यावी.

*⚜Date of entry in service -*
आपल्या सेवेची आरंभ दिनांक म्हणजेच जॉइनिंग date इथे नमूद करावी.
शिक्षण सेवक म्हणून सुरुवात असली तरी शिक्षण सेवक (नोकरी आरंभ) रुजू दिनांक इथे टाकावी.

*⚜Date of joining current mgmt -*
ही दिनांक टाकताना बरीच गफलत झाल्याचे दिसून येते.
*सध्या आपण ज्या जिल्हा परिषद मध्ये आहात, त्या जिल्हा परिषद ची रुजू दिनांक इथे नमूद करावी.*

सुरुवातीपासून याच जिल्ह्यात असाल तर आपल्या नोकरी आरंभाची व ही तारीख एकच येईल.

जिल्हा बदली झाली असेल तर सध्याच्या जिल्ह्यातील रुजू दिनांक लिहावा लागेल.

या कॉलम मध्ये खालील दिनांक लिहू नये...

शाळेची रुजू दिनांक ❌
ब्लॉकची रुजू दिनांक ❌

*लक्ष्यात घ्या Date of joining current mgmt म्हणजे सध्याच्या संस्थेतील रुजू दिनांक होय.*

*⚜Date of joining current designation -*
यामध्ये तुम्ही सध्या ज्या पदावर आहात त्या पदावर आल्याची तारीख इथे नमूद करावी.

शिक्षण सेवक म्हणून नोकरी आरंभ झाली असेल आणि सध्या सहा. शिक्षक/पदवीधर असाल तर या पदावर आल्याची तारीख नमूद करावी.

सहा. शिक्षक म्हणून नोकरी आरंभ झाली आणि आता पदवीधर/मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असाल तर या पदावर येण्याची तारीख नमूद करावी.

*थोडक्यात सांगायचे म्हणजे आपण सध्या जे पद धारण केले आहे, त्या पदावर आल्याची तारीख इथे अपेक्षित आहे.*

*⚜Date of joining District -*
या कॉलम मध्ये आपली सध्याच्या जिल्ह्यातील रुजू दिनांक लिहावी.

जिल्हा बदली झाली असेल तर सध्याच्या कार्यरत जिल्ह्याची रुजू दिनांक लिहावी लागेल.

जिल्हा बदली नसेल तर नोकरी आरंभ दिनांक व ही दिनांक सारखीच येईल.

*⚜Date of joining Block -*
सध्याच्या कार्यरत पंचायत समिती चा रुजू दिनांक इथे नमूद करावा.

*⚜Date of joining current school -*
आपण सध्या ज्या शाळेत कार्यरत आहात, त्या शाळेत आल्याची म्हणजेच सध्याच्या शाळेची रुजू दिनांक इथे लिहावी.

  ◣◢◤◥◣🇲 🇸🇵◢◤◥◣◢
      *🎭яιтεsн ηιℓεωαя🎭*
         *- αкσℓα (ⓐⓚⓞⓣ)*
     ┄─┅━━♍💲🅿━━┅─┄
    *🌈 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌈*

Sunday, 25 June 2017

हरित सेना नोंदणी करणे

 grenarmy साईटवर 4 Crore Report  टँबवर क्लिक केल्यावर Dist   Taluka   अ Agency  ( Rural development किंवा educational institute )यात तालुक्यांतील शाळांनी भरलेली माहीती दिसते .तेथे  जर प्रत्येक शाळेचे Target  10 असेल व No.of pits Dug यातही 10 असावे जास्त असल्यास चालेल परंतु कमी अथवा 00 असणार नाही याची दक्षता घ्यावी मा.जिल्हाधिकारी व CCF DCF कायाँलयाकङून सतत पाठपुरावा सुरु आहे प्रत्येक शाळेने सवँ माहीती भरणे आवश्यक आहे .
तरी सर्व गटशिक्षणाधिकारी महोदयांनी स्वतः ही प्रकिया पाहावी साईट बंद झाल्यानंतर अडचण होईल .                                                                        प्रविण अहिरे                                   शिक्षणाधिकारी ( प्राथ.)                     जि.प.नाशिक

Sunday, 18 June 2017

Friday, 16 June 2017

MDM विषयी माहिती

MDM विषयी माहिती

१७ प्रश्न इंग्रजी ONLINE प्रत व त्याचे मराठीत रुपांतर तसेच केंद्रप्रमुख यांना द्यावी लागणारी प्रत 

Monday, 12 June 2017

इ. १० वी २०१७ चा ऑनलाईन निकाल

इ. १० वी २०१७ चा ऑनलाईन निकाल आपण खालील लिंकवर पाहू शकता,

SSC Result - 2017 येथे पहा.