google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Sunday 14 January 2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा

 माझी शाळा सुंदर शाळा चे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेबाबत...


    सुंदर शाळा हा उपक्रम दिनांक 1 जानेवारी 2024 पासून ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत 45 दिवस हा उपक्रम राबवला जाणार आहे या अंतर्गत या शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन education .maharashtra.gov.in या वर जावून स्कूल पोर्टल मधून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यावर जाऊन शाळेचे रजिस्ट्रेशन  सर्व शाळांनी करावयाचे आहे. यासंदर्भात सोबत व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ बघून त्यानुसार आपल्या शाळेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावयाचा आहे. तसेच हे रजिस्ट्रेशन करताना  एक जानेवारीपासून तर आज पावतो आपण जे उपक्रम राबविले आहेत त्या उपक्रमांची   मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या मध्ये आपण राबवलेल्या उपक्रमांची माहिती नोंदवायची आहे व पीडीएफ स्वरूपात फोटो अपलोड करावयाचे आहेत तरी सर्व शाळांनी याबाबत कार्यवाही करावी परंतु हा 45 दिवसाचा उपक्रम असल्यामुळे फायनल सबमिट करू नये. 45 दिवसाचे आपल्याला दर आठवड्याला किंवा दररोज याची ऑनलाईन माहिती  भरावयाची आहे. व उपक्रम संपल्यानंतर फायनल सबमिट करावयाचे आहे. आपण जर आजच फायनल सबमिट केले, तर सदर याच्यावर आपल्याला माहिती भरता येणार नाही.

    तरी सर्वांनी याची काळजी घ्यावी आणि हा उपक्रम माननीय मुख्यमंत्री यांचा असल्याकारणाने याचा दर आठवड्याला आढावा घेतला जाणार आहे, त्यामुळे या उपक्रमाच्या संदर्भात जो शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयाप्रमाणे शाळा स्तरावर 45 दिवस उपक्रम राबवून ऑनलाइन त्याची दर आठवड्याला नोंदणी करावयाची आहे. आपण दर गुरुवारी आपल्याला अहवाल द्यायचा असल्याने आपण आठवडाभरातले सर्व उपक्रम गुरुवारपर्यंत नोंदवायचे आहेत, तर या सूचनेची सर्वांनी नोंद घ्यावी.

    या उपक्रमा संदर्भात विविध अधिकारीभेटी देऊन पाहणी होणार आहे तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांना याबाबत माहिती आहे का हे तपासणार आहेत.सर्व मुख्याध्यापक यांनी याबाबत च्या शासन निर्णयाचे प्रिंट काढून त्याचे शिक्षक सभा घेऊन वाचन करून घ्यावे व त्यावर सर्व शिक्षकांची स्वाक्षरी घ्यावी.

    तसेच  या उपक्रमात शाळांना रँकिंग देऊन शाळांना पारितोषिक देखील दिले जाणार आहे. तरी या उपक्रमाची अंमलबजावणी सर्वांनी नियमित करावी.  उद्यापासून शाळचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात करावी .आपण रजिस्ट्रेशन केले की नाही हे BEO लॉगिन वर दिसणार आहे.

**********

खालील व्हिडिओ पाहून आपण शाळा रजिस्ट्रेशन करू शकता ..

https://youtu.be/OsP_Ja-HaOU?si=WkmxrnFwbUFscnWx

No comments:

Post a Comment

If you have any doubts . please contact me.