पायाभूत चाचणी
जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना व उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत*.
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा यांमधील इ ३ री ते ९वी या वर्गातील विद्यार्थांची प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयांसाठीची पायाभूत चाचणी दि १० ते १२ जुलै २०२४ या कालावधित होणार आहे . सदर चाचणी साठीच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरांपर्यंत पोहोच झालेल्या आहेत . शिक्षक सूचना व उत्तरसूची या परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संकेतस्थळावरील किंवा सोबत दिलेल्या लिंकवर जावून आपण शिक्षक सूचना व उत्तरसूची डाऊनलोड करून घेऊ शकता .याची माहिती आपले स्तरावरून आपल्या अधिनस्थ शाळांपर्यंत व शिक्षकांपर्यंत देण्यात यावी .
शिक्षकसूचना लगेच पाहता येतील मात्र उत्तरसूची या परीक्षा नियोजनाप्रमाणे १० जुलै रोजी प्रथम भाषा, ११ जुलै रोजी गणित आणि १२ जुलै रोजी तृतीय भाषा या विषयाप्रमाणे त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर प्रसिद्ध केल्या जातील .
शिक्षक सूचना पाहण्यासाठी लिंक 👉 https://drive.google.com/drive/folders/1AFsJ0symVCz8kg4iq-cmnCKLzO8wIJ_R?usp=drive_link
( राहूल रेखावार, भाप्रसे)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment
If you have any doubts . please contact me.