सुपर 50 नविन वेळापत्रक
BMI काढणे
- HOME
- ई - पाठ्यपुस्तके
- ABL शाळा
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- सरळ डाटाबेस
- थोर समाजसुधारक
- SSC Board
- गणितीय क्लुपत्या ( Tricks)
- महाराष्ट्रातील किल्ले
- शैक्षणिक ऐप्लिकेशन
- अकारिक नोंदी
- ऑनलाईन टेस्ट
- परिपत्रके (G R )
- पेसा अंतर्गत गावे
- २ ते १० चे संगीतमय पाढे
- शिष्यवृत्ती
- इंग्रजी व्याकरण
- 7 / 12 उतारा शोधा
- वार्षिक नियोजन
- घटक नियोजन
- PPT
- पायाभूत चाचणी
- ५ ते ८ वी स्काॅलरशीप
- आधार कार्ड
- MDM Aap
- विध्यार्थी लाभाच्या योजना
- BMI काढणे
- MAHADBT वेब साईट
- Online Shoping
- Contact Us
- Privacy Policy
- Disclaimer
- Terms and conditions
- School Gallery
- सामान्य ज्ञान : (General Knowledge. )
- !! इंग्रजी शिकुया !!
Saturday, 7 June 2025
Monday, 12 May 2025
SSC Result 2025
दि. १३ मे २०२५ , दुपारी १:००
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)पुणे, यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या SSC 2025 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या.
2) https://sscresult.mahahsscboard.in/
Monday, 5 May 2025
12 वी चा निकाल . HSC result-2025
दि. ५ मे २०२५ , दुपारी १:००
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)पुणे, यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या HSC 2025 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या.
2) https://sscresult.mahahsscboard.in/
मोफत नवीन प्रवेश ( Free new admission)
चला तर जाणून घेऊया शाळेची काही खास वैशिष्टे .
आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करूया.
Friday, 2 May 2025
शाळेतील 'फोर हाऊस
*शाळेतील 'फोर हाऊस' म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांची चार गटात विभागणी. प्रत्येक गटाला एक नाव आणि एक विशेष रंग असतो. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना एक वेगळी ओळख मिळते आणि ते त्यांच्या गटाच्या नावाने ओळखले जातात.*
शाळा 'फोर हाऊस' प्रणालीचे फायदे:
संघभावना:
विद्यार्थ्यांना त्यांच्या गटासोबत काम करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांच्यात संघभावना वाढते.
स्पर्धा:
विविध कार्यक्रमांमध्ये गटांमध्ये स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते.
नेतृत्व विकास:
विद्यार्थ्यांना गटाचे नेतृत्व करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांच्यात नेतृत्व क्षमता विकसित होते.
वैशिष्ट्ये:
प्रत्येक गटाला विशिष्ट वैशिष्ट्ये दिली जातात, जसे की सातत्य, दृढता, चिकाटी, जबाबदारी, आदर, CMR National Public School नुसार .
शैक्षणिक विकास:
विद्यार्थ्यांना त्यांच्या गटासोबत शैक्षणिक कार्ये करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक ज्ञान वाढते.
सामाजिक विकास:
विद्यार्थ्यांना त्यांच्या गटासोबत विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांच्यात सामाजिक विकास होतो.
'फोर हाऊस' प्रणालीचे काही उदाहरण:
CMR नॅशनल पब्लिक स्कूल:
या शाळेत 'फोर हाऊस' प्रणाली आहे, जिथे विद्यार्थ्यांना चार गटात विभागले जाते, प्रत्येक गटाला एक नाव आणि एक रंग आहे. प्रत्येक गटाला विशिष्ट वैशिष्ट्ये दिली जातात आणि ते विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात.
ज्या शाळेत 'फोर हाऊस' प्रणाली आहे, जिथे विद्यार्थ्यांना फुलांच्या नावावर आधारित आठ गटात विभागले जाते.
'फोर हाऊस' प्रणाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप उपयुक्त आहे. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना एक वेगळी ओळख मिळते, त्यांच्यात संघभावना वाढते, नेतृत्व क्षमता विकसित होते आणि ते विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात, ज्यामुळे ते अधिक उत्साही आणि सक्रिय होतात.
Friday, 25 April 2025
स्कॉलरशिप निकाल
इयत्ता पाचवी व आठवीचा स्कॉलरशिप चा निकाल आत्ताच लागलेला आहे वरील लिंक वर चेक करू शकता👇
Tuesday, 25 March 2025
निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम
निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीच्या नोंदी
संदर्भ : शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७९/ एसडी-६, दिनांक: ०५ मार्च, २०२५.
Thursday, 27 February 2025
मराठीची जन्म कथा..
प्राकृत संस्कृत फारसी अरबी भले भले शब्द देशी विदेशी वैभवे तू महाराष्ट्रास नेशी माय मराठी तू कशी जन्मशी...
सप्तशतींची गाथा प्राकृतात प्रसवली भरजरी पितांबर सह्याद्रीस नेसविली प्राकृताची गोडी संस्कृताची प्रचुरता शब्दांची गुढता संत कवींनी वाढविली
विवेकाचा सिंधू उफाळून आला ज्ञानेशाची दीपिका भावार्थ साधला चरित्र लीळांचे माहीमभटा लिहिले मराठीचे बालपण त्यांनी पाहिले
नामदेव कीर्तनाचे रंगी नाचला निरक्षर चोखोबाने विठ्ठल वाचीला जनाबाईने श्रमातून विठ्ठल पूजीला शब्दा शब्दा मधून विठ्ठल वाहिला
मराठीचे दारात चिखल साठला महाराष्ट्र सारा परचक्राने पेटला भाषेत घुसली मग भाषा निराळी फारसी अरबी हड्डी मासी खिळली
दुर्ग झाले किल्ले खड्ग झाल्या तलवारी धोतराच्या झाल्या तुमानी परचक्रे किती आस्मानी सुल्तानी !
तशात रचली किती कवणे पुराने माय मराठीचे नव्या रूपात अवतरणे एकनाथी भागवत तुकोबांची गाथा किती नमवावा तया चरणी माथा !
मनाच्या श्लोकांचा दासाला बोध झाला बखरी शकावल्या जंत्र्या किती निर्मिल्या श्लोक आरत्या अभंग अन् भुपाळ्या मराठीच्या अंगावर अलंकार चढविला
लावणीचे लावण्य पोवाड्याचे धिटपण फटक्यांचे शहाणपण देवाचे निरूपण गीत संगीताने रूप सजले मराठीचे गुण गाई अभिजीत माय मराठीचे...
- अभिजीत घाडगे (8793884978)
Saturday, 1 February 2025
Tax calculator
See the comparisons of old and new tax scheme
( या मध्ये फक्त तुमचं वार्षिक उत्पन्न टाका जुन्या आणि नवीन टैक्स मधला फरक दिसेल )
नवीन करप्रणालीने बऱ्याच जणांचा गोंधळ झालेला दिसतोय, १२ लाखावर टॅक्स लागणार मग हे ४ लाखाच्या वर ५ % आणि असे टॅक्स स्लॅब का दिले आहेत? असं बरेच जण विचारतात. तुमचा देखील गोंधळ झाला असेल तर पूर्ण वाचा, समजून घ्या.
निव्वळ करपात्र उत्पन्न (Net Taxable Income) 12 लाख रुपयांपर्यंत असेल तर कोणताही कर लागू होणार नाही. पूर्वी 87A अंतर्गत करसवलतीची मर्यादा ₹७ लाख होती, ती आता ₹१२ लाख करण्यात आली आहे. तसेच, या सवलतीची कमाल रक्कम ₹२५,००० वरून ₹६०,००० करण्यात आली आहे.
१५ लाख कमावणाऱ्याला केवळ ३ लाखावर कर भरावा लागेल का?
:- नाही!
जर तुमचे उत्पन्न ₹१२ लाखांपेक्षा जरी १ रुपया जास्त असेल, तर तुम्हाला संपूर्ण उत्पन्नावर करप्रणालीनुसार कर भरावा लागेल. त्यासाठी खालील टॅक्स स्लॅब आणू उदाहरण बघा.
नवीन करस्लॅब:
₹० ते ₹४ लाख: शून्य कर
₹४ लाख ते ₹८ लाख: ५% कर
₹८ लाख ते ₹१२ लाख: १०% कर
₹१२ लाख ते ₹१६ लाख: १५% कर
₹१६ लाख ते ₹२० लाख: २०% कर
₹२० लाख ते ₹२४ लाख: २५% कर
₹२४ लाखांपेक्षा जास्त: ३०% कर
ही करसवलत फक्त पगार, व्यवसाय इत्यादी सामान्य उत्पन्नासाठी लागू असेल.
भांडवली नफा (Capital Gains) किंवा इतर विशेष उत्पन्नासाठी ही सवलत उपलब्ध नाही.
उदा. जर तुमचं इन्कम 13,00,000 असेल तर
0–4 lakhs: 0% → ₹0
4–8 lakhs: 5% on ₹4,00,000 → ₹20,000
8–12 lakhs: 10% on ₹4,00,000 → ₹40,000
12–13 lakhs: 15% on ₹1,00,000 → ₹15,000
Total Tax Payable = ₹75,000
अजून एक पगरावर 75,000 डीडक्शन मिळतं, त्यामुळे 12,75,000 पर्यंत टॅक्स लागणार नाही
Tuesday, 14 January 2025
52 वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा 2025
52 वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा 2025 सर्वांनी व्हिडिओचा शेवट जरूर पहावा कारण यामध्ये जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय श्री विनीत पवार सर यांची खास अशी एक मुलाखत घेतलेली आहे ती सर्वांनी जरूर पहावी.