google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: सरल महत्वाचे :
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Thursday, 11 May 2017

सरल महत्वाचे :

सरल महत्वाचे :
सूचना क्रमांक : १०४०
दिनांक : १०/०५/२०१७
(सदर पोस्ट ही मा.डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)
______________
➡ स्टाफ व ट्रान्सफर पोर्टलच्या नवीन वेळापत्रकाबाबत सूचना
➡ Attach-Detach सुविधेबाबत सूचना
➡ Caste माहिती भरण्याबाबत सूचना
➡ Map-Unmap विषयी सूचना
➡ शिक्षकांनी माहिती भरताना चुकलेल्या Designation बाबत सूचना ______________

✏ स्टाफ व ट्रान्सफर पोर्टलच्या नवीन वेळापत्रकाबाबत सूचना

पुणे,मुंबई,कोल्हापूर,नाशिक विभागातील जिल्हा परिषद शाळांना आंतरजिल्हा बदली साठी आवश्यक असलेली माहिती स्टाफ व ट्रान्सफर पोर्टल मध्ये भरण्यासाठी अंतिम मुदतवाढ दिनांक ११/०५/२०१७  देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.दिनांक १२ मे पासून उर्वरित विभागातील जिल्ह्यांना योग्य नियोजनासह लॉगिन उपलब्ध करून दिले जाणार आहे हे लक्षात घेऊन सध्या लॉगिन सुरू असलेल्या विभागातील जिल्ह्यांनी आपले काम वेळेत पूर्ण करून घ्यावे.या अंतिम मुदतीनंतर आपली माहिती भरावयाची राहून गेली तरी कोणत्याही परिस्थतीत आपणास मुदतवाढ दिली जाणार नाही अशा सूचना प्राप्त झालेल्या आहेत.

✏ Attach-Detach सुविधेबाबत सूचना

ज्या शिक्षकांना Attach Detach संदर्भात समस्या होती ती समस्या देखील आज सोडवण्यात आलेली आहे.तरी अशा समस्येमुळे ज्या शिक्षकांची माहिती भरावयाची राहुन गेली होती त्यांनी आपली माहिती भरून आंतर जिल्हा बदली फॉर्म भरून पूर्ण करावा.

तसेच नवीन शाळेस Attach होत नाही म्हणून जुन्या शाळेतून ट्रान्सफर फॉर्म भरावा अशा प्रकारची whatsapp पोस्ट काही शिक्षक बांधवांनी whatsapp द्वारे केलेली आढळून आलेले आहे.तरी सर्वांना सूचित करण्यात येत आहे की,अशा चुकीच्या पद्धतीने कोणतीही माहिती आपण भरू नये.कारण आपला फॉर्म व कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाद्वारे तपासली जाणार आहे.या तपासणीत अशा प्रकारच्या जुन्या शाळेतून भरलेला फॉर्म निदर्शनास आल्यास होणाऱ्या अडचणीसाठी आपण स्वतः जबाबदार असाल हे लक्षात घ्यावे. कोणत्याही शिक्षकांनी एकदा आपल्या बदलीचा फॉर्म भरून verify केला असेल तर त्यानंतर सदर फॉर्म मध्ये दुरुस्थी करणे अथवा फॉर्म Delete करता येत नाही.तरी सर्वांना सूचित केले जात आहे की,नवीन शाळेत शिक्षक माहिती भरताना आपण काळजीपूर्वक भरावी.आपली एक चूक देखील आपल्या आंतरजिल्हा बदली मध्ये अडचणीची ठरू शकते.

✏ Caste माहिती भरण्याबाबत सूचना

ज्या शिक्षकांची कास्ट विषयीची माहिती क्लस्टर लेवल का verify करण्यासाठी दिसत नव्हती ही समस्या काल उशिरा सोडवण्यात आलेली आहे.तरी अशा समस्येमुळे ज्या शिक्षकांची माहिती भरावयाची राहुन गेली होती त्यांनी आपली माहिती भरून आंतर जिल्हा बदली फॉर्म भरून पूर्ण करावा.

✏ Map-Unmap विषयी सूचना

Attach-Detach करताना समस्या येत असल्याने काही शिक्षक बांधवांनी स्वतःला unmap करून घेऊन नवीन शाळेत माहिती भरता येते अशा संदर्भात काही शिक्षक मंडळींनी whatsapp द्वारे पोस्ट केलेली होती.या पोस्टच्या माहितीच्या आधारावर बऱ्याच शिक्षकांनी स्वतःला unmap केलेले आहे.आता अशा शिक्षकांना पुन्हा map करताना समस्या येत आहे.परिणामी असे शिक्षक आता ट्रान्सफर पोर्टल ला ट्रान्सफर फॉर्म भरू शकत नाही आहे.अशा पद्धतीने प्रोसेस करणे पूर्णतः चुकीचे आहे.मित्रांनो,अशा प्रकारे कोणीही माहिती भरण्याची कृती करू नये.अन्यथा आपणास ट्रान्सफर फॉर्म भरता न आल्यास यासाठी आपण स्वतः जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.

जे शिक्षक बदली द्वारे नवीन शाळेत Attach झालेले आहे.मात्र Attach Detach च्या समस्येमुळे ट्रान्सफर  त्यांनी स्वतःला unmap केलेले आहे.अशा केस मध्ये या शिक्षकांना पुन्हा मॅप करताना अडचण येऊ शकते.अशा पद्धतीने unmap करणे अयोग्य आहे.परंतु ही सूचना मिळेपर्यंत काही शिक्षकांनी स्वतःला unmap करून घेतलेले असेल.अशा शिक्षकांना सूचित करण्यात येत आहे की,जर आपले maping होत नसेल तर आपण गटशिक्षणाधिकारी लॉगिन मधून आपली New Recruitment या फॉर्म मधून नोंद करून घ्यावी व आपली इतर माहिती स्टाफ पोर्टल ला update करावी.या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यावी की जे शिक्षक जुन्या शाळेतून नवीन शाळेत बदली करून आलेले आहेत परंतु स्वतः च्या चुकांमुळे unmap झालेले आहे अशाच शिक्षकांनी या सुविधेचा वापर करावा.

✏ शिक्षकांनी माहिती भरताना चुकलेल्या Designation बाबत सूचना

ज्या शिक्षकांनी स्टाफ पोर्टल मध्ये  आपली माहिती भरलेली आहे,परंतु काही शिक्षकांच्या बाबतीत मात्र ही माहिती भरताना त्यांचे पद (Designation) निवडताना चुक झालेली आहे.अशा केस मध्ये Designation दुरुस्थ करण्याची सुविधा उद्यापासून देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.ही सुविधा शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला देण्यात आलेली आहे.

______________
टीप:  सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या सूचना करताना वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळविण्याचा व आपणास मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत जर समजुतीचा घोटाळा झालेला असेल तर सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपले काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मागरदर्शन असून शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.
______________

No comments:

Post a Comment

If you have any doubts . please contact me.