__________________________________________
➡ *Teacher-Transfer Form भरल्यानंतर काय करावे,या बाबत सूचना*
➡ *नवीन वेळापत्रकाबाबत सूचना* __________________________________________
आंतर जिल्हा बदली फॉर्म भरून मुख्याध्यापक login मधून एकदा verify केला की त्यानंतर त्यात चूक झालेली असेल तरी ती दुरुस्थ करता येत नाही. *ट्रान्सफर फॉर्म हा कोणत्याही login मधून return करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही आहे हे लक्षात घ्यावे*.म्हणून सर्वांनी हा फॉर्म काळजीपूर्वक verify करावा.बऱ्याच शिक्षकांना असे वाटते की मुख्याध्यापक login मधून ट्रान्स्फर फॉर्म भरला की तो फॉर्म गटशिक्षणाधिकारी यांच्या login मधून verify करावा लागतो.परंतु असे नाही आहे. *ट्रान्सफर फॉर्म मुख्याध्यापक login मधून verify केल्यावर त्यानंतर तो फॉर्म कोणत्याही login ला verify करण्यासाठी फॉरवर्ड केला जात नाही हे लक्षात घ्यावे.सदर फॉर्म हा मुख्याध्यापक login मधून verify केला की या फॉर्म ची प्रिंट काढावी.या फॉर्म ची प्रिंट व त्या प्रिंटेड फॉर्म मध्ये सांगितल्या प्रमाणे योग्य त्या कागद पत्रांची एक प्रत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे माहितीसाठी द्यावी.गटशिक्षणाधिकारी हे शिक्षकांनी दिलेला फॉर्म व कागदपत्रांची तपासणी करून आपली स्वाक्षरी करतील व सदर फॉर्म हा आपाल्याजवळ जमा करून घेतील.शिक्षकांनी ही प्रत कार्यालयात जमा केल्याची पोहोच आपल्याकडे घेऊन ठेवण्यास हरकत नाही.*
गटशिक्षणाधिकारी यांनी *योग्य वेळी हे कागदपत्रे आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या मार्फत ग्राम विकास मंत्रालयाकडे तपासणीसाठी पाठवायचे आहे याची नोंद घ्यावी*.या संबंधी योग्य वेळी सूचना देण्यात येणार आहे.
समजा शिक्षकांनी आपला आंतरजिल्हा बदली साठीचा फॉर्म भरलेला आहे व त्यानंतर हा फॉर्म गटशिक्षणाधिकारी लॉगिन ला जमा करताना गटशिक्षणाधिकारी यांच्या असे लक्षात आले की,सदर फॉर्म भरताना काही चुका झालेल्या आहेत. *अशा वेळी गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांनी भरलेला फॉर्म परत न करता आपणाकडे जमा करून घ्यावा.परंतु आपल्या निदर्शनास आलेली चूक ही शिक्षकांच्या लक्षात आणून द्यावी.तसेच ही झालेल्या चुकी बाबत नोंद ठेवावी.ज्या वेळी प्रत्यक्ष ट्रान्सफर प्रक्रिया सुरु होईल तेंव्हा योग्य वेळी अशा चुकीच्या फॉर्म विषयी आपणाकडून ही माहिती ग्रामविकास मंत्रालयाकडून मागवली जाणार आहे हे लक्षात घ्यावे.*
चुकीची माहिती भरून आपला फॉर्म स्वतः verify केल्याने भविष्यात काही अडचण निर्माण झाल्यास स्वतः अर्जदार त्यास जबाबदार असतील यामुळे आपला फॉर्म काळजीपूर्वक भरावा.
*सर्वर च्या तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याचदा पोर्टल स्लो चालणे व खुपदा प्रयत्न करून देखील लॉगिन न होणे यासारख्या अनेक अडचणींना सामोरे जात आपण ही माहिती भरत आहोत.अशा वेळी संयम ठेवून ही प्रोसेस पार पाडावयाची आहे.कारण पाहिल्यांदाच अशा प्रकारे online पद्धतीने बदली प्रक्रिया पार पडत आहे.सर्वांसाठीच हा पहिला अनुभव आहे.त्यामुळे या सर्व समस्यांतून मार्ग काढत आपणा सर्वांना ही नवीन प्रणाली यशस्वी करावयाची आहे.फॉर्म भरताना मार्गदर्शनाच्या अभावाने झालेल्या थोड्याफार चुका या सर्व पातळीवर समजून घेणे अपेक्षीत आहे.तसेच सर्व पातळीवर सर्वांनी (गटशिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुख लॉगिन) आमच्या शिक्षक बांधवांना सहकार्य करावे अशी विनंती व आवाहन मी या पोस्ट द्वारे सर्वाना करत आहे.*🙏🙏
➡दोन दिवसांपासून सर्वरच्या तांत्रिक अडचणीमुळे पोर्टल ला लॉगिन होण्यासंबंधी अडचण आलेली होती ती अडचण काल उशिरा सोडवण्यात आलेली आहे.त्यामुळे या आधी सांगितलेले वेळापत्रकानुसार अद्याप पर्यंत त्या त्या विभागांना लॉगिन उपलब्ध आहे. *ट्रान्सफर पोर्टल हे शालेय शिक्षण विभागाचे नसून ग्राम विकास मंत्रालयाचे असल्याने* काल उशिरापर्यंत मुदत वाढ अथवा नवीन वेळापत्रक या संबंधी कोणतीही अधिकृत माहिती अथवा मार्गदर्शन ग्राम विकास मंत्रालयातील वरिष्टाकडून उपलब्ध न झाल्याने सध्या आपणास याबाबत काहीही माहिती देऊ शकत नाही आहे.तरी *सध्या पुणे,मुंबई,कोल्हापूर व नाशिक या विभागांना लॉगिन उपलब्ध आहे,त्या प्रमाणे या विभागातील जिल्ह्यांनी आंतर जिल्हा बदली संदर्भात असलेले आपले काम पूर्ण करून घ्यावे.नवीन update माहिती मिळाल्यास आपणास कळवण्याचा प्रयत्न केला जाईल.*
*टीप:* *सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या सूचना करताना वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळविण्याचा व आपणास मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत जर समजुतीचा घोटाळा झालेला असेल तर सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपले काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मागरदर्शन असून शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.*
No comments:
Post a Comment
If you have any doubts . please contact me.