google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: आधार लिंकिंग करणे .
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Friday 8 September 2017

आधार लिंकिंग करणे .

स्टूडेंट पोर्टल वर विद्यार्थी आधार कार्ड ( UID ) माहिती एक्सेल फाईल मध्ये कशी भरावी


विद्यार्थी UID माहिती भरण्यासाठी एक्सेल file डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला पुढील बाबी महत्वाच्या आहेत

👇👇👇💥💥🇮🇳🇮🇳🇮🇳


📌 आपल्या समोर विद्यार्थी आधार कार्ड असणे गरजेचे आहे कारण त्या मधील सर्व बाबी अचूक भरायच्या आहेत , आधार कार्ड मध्ये विद्यार्थ्याची नावाची जी स्पेलिंग असेल तीच type करायची आहे , तसेच जन्मतारीख व लिंग आधार कार्ड वर आहे तशी नमूद करायची आहे



📌 कोणत्याही परिस्थिती मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाहीत त्याची माहिती भरू नये



आपण जेव्हा एक्सेल फाईल ओपन करू तेव्हा एक नोटिफिकेशन येईल त्यात Yes वर क्लिक करा



📌 आपल्याला फक्त J ते O पर्यंत च्या निळ्या रंगाच्या  कॉलम मध्ये काम करायचे आहे



J कॉलम
➖➖➖
आपल्याला J कॉलम मध्ये एक setting करायची आहे , सर्व प्रथम J कॉलम जो पर्यत विद्यार्थ्यांची  नावे आहेत तीत पर्यंत  mouse च्या सहाय्याने  select करा तो निळ्या रंगात दिसेल



आता J कॉलम मध्येच mouse वर राईट क्लिक करा , येथे खालून चौथा पर्याय format cells असेल त्याच्यावर क्लिक करा



आता येणाऱ्या विंडो मधील Number मधील Text वर क्लिक करून खाली ok वर क्लिक करा , ही setting केल्याशिवाय आपले आधार नंबर type होणार नाहीत



या नंतर J कॉलम मध्ये १२ अंकी आधार क्रमांक विद्यार्थ्याच्या माहीच्या पुढे type करा



K कॉलम मध्ये विद्यार्थ्याच्या नावाची आधार कार्ड वरील स्पेलिंग type करा



L कॉलम मध्ये विद्यार्थ्याचे मधले नाव म्हणजे वडिलांच्या नावाची स्पेलिंग type करा



M कॉलम मध्ये विद्यार्थ्याचे शेवटचे नाव म्हणजे आडनावाची स्पेलिंग type करा



N कॉलम मध्ये विद्यार्थ्याची जन्मतारीख type करा. उदाहरणार्थ – 01-01-2011 अशा format मध्ये type करा , जर आधार कार्ड वर विद्यार्थी जन्मतारीख ही फक्त साल असेल तर तोच साल तेथे type करावा , जसे जन्मतारीख फक्त 2011 असेल तर तेथे 2011 type करा



O कॉलम मध्ये विद्यार्थ्याचा लिंग दिलेल्या पर्याया मधूनच निवडावा , विद्यार्थी जर मुलगा असेल आणि आधार कार्ड वर female झाला असेल तर तेथे female निवडावा



अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्याची माहिती भरून झाल्यावर file save करून csv ( comma delimited ) मध्ये रुपांतरीत करून अपलोड करावी

No comments:

Post a Comment

If you have any doubts . please contact me.