google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: STAFF PORTAL
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Monday 30 October 2017

STAFF PORTAL

जिल्हांतर्गत बदलीपात्र परंतु अॉनलाईन फॉर्म नोंदणी न केलेल्या प्रलंबीत शिक्षकांची यादी. व मार्गदर्शक सुचना.◀


प्रति,
गटशिक्षणाधिकारी,
केंद्रप्रमुख ,
मुख्याध्यापक
अंतर्गत जि.प.नाशिक.

सरल जिल्हांतर्गत बदली ऑलनालईन पोर्टल ला येणा-या सर्व तांत्रीक समस्या राज्यस्तरावरुन सोडविण्यात आलेल्या आहेत. सदयास्थितीत सरल ट्रान्सफर पोर्टल आपल्या पुर्ण क्षमतेने सुरु असून नाशिक जिल्हयाकरीता संवर्ग-4 बदलीपात्र शिक्षकबांधवांना ऑनालाईन आवेदनपत्र भरण्याकरीताची अंतीम मुदत दिनांक-29.10.2017 रोजी (आज) सायं.05.00 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे. तदपुर्वीपर्यंत बदलीपात्र शिक्षकांनाी आपली आवेदनपत्रे भरणे बंधनकारक आहे. याबाबत यापुढे कसलीही मुदतवाढ मिळणे अपेक्षीत नाही याची नोंद घ्यावी.

अदयापही मराठी माध्यम- 316, ऊर्दु माध्यम - 42 जिल्हांतर्गत बदलीपात्र (TUC) शिक्षकांनी आपले आवेदन पत्रे ऑनलाईन पोर्टला न भरणे किंवा VERIFY केलेली नाहीत.अशाची यादी सोबत पाठविण्यात येत आहे. सदरील प्रलंबीत यादीमधील आपले आधिनस्त बदलीपात्र शिक्षक-मुख्याध्यापकांस आपलेस्तरावरुन तात्काळ संबधीताचा जिल्हांतर्गत बदलीचा ऑनालाईन फॉर्म भरणे बाबत सुचीत करावे.

दिलेल्या विहित मुदतीनंतर भरलेले फॉर्म सरल प्रणालीमार्फत नाकारण्यात येवून संबधीतांना संगणकीय प्रक्रीयेस (RANDOM ROUND) ला सामोरे जावे लागेल. कारणास्तव संबधीताची बदली जिल्हयातील कुठल्याही तालुक्यामधील शाळेवर होवू शकते असे याठिकाणी स्पष्ट पणे नमुद करण्यात येते.

करीता दिलेल्या अंतीम मुदतीपुर्वी प्रत्येक बदलीपात्र शिक्षकांनी ऑनालाईन आवेदनपत्र नोंदणी करावी.

जिल्हांतर्गत बदली फॉर्म भरतांना शाळास्तरावर येणा-या तांत्रीक अडचणी. जसे की- बदलीपात्र असूनही नांव न दिसून येणे. इ. बाबत मुख्याध्यापक अधिकृत ई-मेल वरुनegov.saral@gmail.com या शासनाच्या अधिकृत ई-मेल वर कळविण्यात यावे. तसेच त्यासंबधी लेखी अर्ज मुख्याध्यापक-गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत या कार्यालयास जमा करावेत.

उपरोक्त सुचनांची सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे कडुन तंतोतंत अंमलबजावणी अपेक्षीत आहे.

- राजीव म्हसकर,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद नाशिक.

No comments:

Post a Comment

If you have any doubts . please contact me.