google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: January 2018
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Tuesday 30 January 2018

सरल महत्त्वाचे


__________________________________________
*आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुकीच्या पोस्ट वाचून आपले नुकसान होऊ नये म्हणून ही पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

*सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,दिनांक ०१/०२/२०१८ पासून आंतर जिल्हा व दिनांक १५/०२/२०१८ पासून जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार आहे.त्या अनुषंगाने खालील सूचना लक्षात  घेणे गरजेचे आहे.*

👉 *आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बाबत सूचना*

➡ *१) आंतर जिल्हा बदली प्रक्रिया मध्ये मागील वर्षी ज्या शिक्षकांनी फॉर्म भरलेले आहेत,त्या पैकी ज्या शिक्षकांची टप्पा क्रमांक १ मध्ये बदली झालेली नाही अशाच उर्वरित शिक्षकांच्या फॉर्म चा समावेश करण्यात येणार असल्याने दिनांक ०१/०२/२०१८ पासून सुरू होणाऱ्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत नव्याने फॉर्म भरण्याची अथवा याआधी भरलेल्या फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा देण्यात येणार नाही हे लक्षात घ्यावे.बदली प्रणाली मध्ये याआधी save असलेल्या अर्जाच्या माहितीच्या आधारे बदली प्रक्रिया राबवण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.*

➡ *२) मागील वर्षी आंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरलेला आहे व त्यानंतर समायोजन,बदली इत्यादी काही कारणाने अर्जदार शिक्षक दुसऱ्या शाळेत रुजू झालेला असेल तर अशा शिक्षकांनी आपल्या भरलेल्या फॉर्म बद्दल अधिक काळजी करू नये.आपली शाळा बदलल्याने आपल्या आंतर जिल्हा प्रक्रियेवर काहीही परिणाम पडणार नाही हे लक्षात घ्यावे.*

➡ *३) संगणक प्रणाली द्वारे आंतर जिल्हा बदली टप्पा क्रमांक-२ पार पडल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.*

➡ *४) आंतर जिल्हा बदली टप्पा क्रमांक-२ मध्ये पेसा क्षेत्राचा विचार करण्यात येणार असून ज्या शिक्षकांनी आपला फॉर्म भरताना बदली साठी मागणी केलेल्या जिल्ह्याचे आपण स्थानिक ST आहोत असे नमूद केले असेल तर अशा शिक्षकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.*

👉 *जिल्हाअंतर्ग बदली प्रक्रिया-२०१८  बाबत सूचना*

➡ *५) जिल्हाअंतर्ग बदली प्रक्रिया-२०१८ दिनांक १५/०२/२०१८ पासून सुरू करण्यात येणार आहे.मागील वर्षी शिक्षकांनी भरलेले सर्व फॉर्म संवर्गनिहाय unverify करून देण्यात येणार आहे.ज्या शिक्षकांना मागील वर्षी भरलेल्या फॉर्म मध्ये काही बदल करावयाचा असेल तर ते इच्छित बदल करू शकतील.ज्यांना आपण भरलेल्या फॉर्म मध्ये काहीही बदल करावयाचा नाही अशा शिक्षकांनी आपला फॉर्म आहे तसाच वेरीफाय करावयाचा आहे.तसेच मागील वर्षी भरलेला फॉर्म आपणास Delete करावयाचा असेल तरी देखील आपण सदर फॉर्म delete करू शकणार आहात,हे लक्षात घ्यावे.तसेच मागील वर्षी फॉर्म न भरलेले शिक्षक देखील या वर्षी नव्याने फॉर्म भरू शकतील.*

➡ *६)या वर्षी पासून ज्या शिक्षकांनी आपला फॉर्म अंतिम मुदतीपर्यंत वेरीफाय केला नसेल तर सिस्टिम द्वारे प्राप्त माहितीच्या आधारे सदर फॉर्म अंतिम मुदतीनंतर ऑटो-वेरीफाय करून घेतला जाईल.अंतिम क्षणी सर्वर वर लोड आल्याने,इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने फॉर्म वेरीफाय करावयाचा राहून गेल्याच्या समस्या उद्भवू नये यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.*

➡ *७) या वर्षीपासून अवघड क्षेत्रातील असे क्षेत्र की ज्या ठिकाणी महिलांना सेवा करणे सोयीचे होणार नाही असे क्षेत्र मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या द्वारे घोषित केले जाणार आहे.आशा घोषीत केलेल्या ठिकाणी कोणत्याही महिलेला रँडम राउंड मध्ये बदली केली जाणार नाही.परंतु अशा ठिकाणी सेवा करावयाची इच्छा असलेल्या महिला शिक्षकाला मात्र आपली बदली अशा क्षेत्रात करून घेता येईल हे देखील लक्षात घ्यावे.तसेच अशा घोषित केलेल्या अवधड क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कोणत्याही महिला शिक्षक  कर्मचाऱ्याला संवर्ग-३ मध्ये बदली अधिकार प्राप्त होण्यासाठी ३ वर्षाच्या सेवेची अट क्षितील राहील,याची नोंद घ्यावी.*

➡ *८) संच मान्यता संदर्भात स्कूल,संच व student पोर्टल मध्ये असलेली शाळा व केंद्रप्रमुख स्तरावरून करावयाची कार्यवाही आज अखेर पूर्ण करावयाची आहे.अपूर्ण काम असणाऱ्या संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना कालच्या vc मध्ये मा.सचिव महोदयांनी दिलेल्या आहेत हे लक्षात घ्यावे. आपल्या स्तरावरील संच मान्यता विषयी असलेले सर्व अपूर्ण काम पूर्ण करून घ्यावे ही विनंती.*

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

Tuesday 9 January 2018

संचमान्यता सन -२०१७-१८.


 student portol वरील पटसंख्यानिहाय संचमान्यता केंद्र प्रमुख login  ला forward करण्याचे टप्पे

 ✍सन २०१७ /१८ ची संचमान्यता* ही मुख्याध्यापकाने forward केलेल्या student portol वरील  पटसंख्येनुसारच अंतिम केली जाणार आहे ही बाब सर्वानी लक्षात  घ्यावी
 संदर्भ दि.२८/१२/२०१७ च्या vc मधील सुचना
.............................................

 मुख्याध्यापकांनी नक्की काय करावे ?

 ✍१) सर्व प्रथम आपल्या शाळेचे student portol login करावे login केल्यानंतर  आपणास संचमान्यता नावाची tab तेथे दिसेल पैकी संचमान्यता २०१७/१८ या  sub tab वर click करावे

✍२) तेथे click केल्यानंतर आपणास आपल्या शाळेचा इयत्तानिहाय पट दिसेल हा पट आपण आपल्या offline पटसंख्येशी पडताळून पाहावा ... व बरोबर असल्याची खाञी करावी पटसंख्येतील तफावत असल्यास beo साहेबांना यांना तात्काळ  कळवावे व आपल्या शिक्षक निश्चितीवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी

✍३) आपल्या समोर दिसणारी  पटसंख्या ,management,मिडियम ,aid अशा बाबी चेक कराव्यात जर आपल्या शाळेचे aid हे not applicable दाखवत असेल तर आपणास forward for sanchmanyata ही tab दिसत नाही अशावेळी काय करावे समजून घ्या.

✍४) ज्यावेळी आपल्या शाळेचे aid हे not applicable असे दाखवते अशावेळी" आपण सर्व प्रथम master नावाच्या tab वर जाऊन तेथील division या sub tab वर click करावे यानंतर प्रत्येक वर्ग व त्याची पटसंख्या आपणास दिसेल अशावेळी आपण प्रत्येक वर्गावर click करून Aid हे AIDED  करून update करावे असे आपल्या शाळेतील  सर्व वर्ग व तुकडी यांचे बाबत करावे ..
संकलन - गोरक्ष सोनवणे सिन्नर

✍५) यानंतर " आपण पुन्हा student portol वरिल  संचमान्यता या tab वर जाऊन sanchyamanyata 2017/18 या वर click करावे आता आपणास प्रत्येक वर्ग व तुकडी समोर not applicable ऐवजी aided असा बदल झालेला दिसेल आणि या बदलानंतर आपल्या forward for sanchayamanyata नावाचि नारंगी रंगाची tab उपलब्ध झालेली दिसेल
पुन्हा एकदाonline व offline  पटाची खाञी करून घ्यावी व मगच सदर forward tab वर click करावे येथे hm चे काम संपते १ शाळेस किमान फक्त 5 मि.लागतात G

✍६) कारण एकदा forward केलेली  student portol वरिल पटसंख्या संचमान्यता ही कोणत्याही परिस्थितीत return करता येत नाही. HM चे काम यावर्षी अंतिम समजून संचमान्यता आदेश दिले जाणार आहे.  त्यामुळे कृपया शिक्षक कमी, जास्त, अतिरिक्त व समायोजनास पाञ ठरणार नाही यादृष्टीने काळजी घ्यावी ं

🎤  मुख्याध्याकासांठी  महत्त्वाचे

🎤१) सर्व Kp महोदय सदर post तात्काळ आपल्या cluster head ला पाठवा दि. 10/1/2018 अखेर hm कडून सदर संचमान्यता काम करुन घ्यावे ही विनंती ..कृपया मी आवाहन करतो की कोणत्याही प्रकारचे गैरसमज न पसरवता संचमान्यता काम काळजीने करावी ही विनंती 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
🎤2) संचमान्यता हे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याने काळजीपूर्वक करावे यापूर्वी आपण school portol मधील संचमान्यता काम केले आहे. आता student portol मध्ये   वरीलप्रमाणे करायचे आहे एका शाळेस फक्त ५ मि. लागतात ..

🎤3) student portol वरील संचमान्यता forward केल्यानंतर व करण्यापूर्वी १ print काढून आपल्या शालेय दप्तरी ठेवावी तांत्रिक अडचणी उदभवल्यास तिचा उपयोग होईन 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

सर्वानी सदर कामास अधिक प्राधान्य द्यावे.

धन्यवाद  .


Monday 8 January 2018

संच मान्यतेसाठी शाळांनी आपले विध्यार्थी केंद्रस्तरावर पाठविणे आवश्यक आहे. केंद्रस्तरावरून विद्यार्थीना approval मिळाल्यानंतरच ते विद्यार्थी पुढे संच मन्यतेसाठी दिसणार आहेत. याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी.

Thursday 4 January 2018

✅ *संचमान्यता* 2017-18 ✅

सर्व मुख्याध्यापक संच मान्यतेसाठी माहीती फ़ॉर्वर्ड साठी टॅब उपलब्ध झाला असून माहीती क्लस्टरला फ़ॉर्वर्ड करण्यापूर्वी महत्वाचे १७-१८ संच मान्यतेचा अंतिम टप्पा १ ते १५ जानेवारी या कालावधीत होत आहे ... या कालावधीत प्रत्येक मुख्याध्यापकाने खालील बाबी अत्यंत काळजीपुर्वक पहाणे आवश्यक आहे या वर्षी शाळेकडुन आलेली माहीती अंतिम समजुन  आदेश दिले जाणार आहेत .मा संचालक साहेबानी यापुर्वीच्या योग्य दुरुस्त्या करुन दिल्या आहेत . त्यामुळे यापुढे कोणतीही दुरुस्ती नंतर करुन दिली जाणार नाही ... त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे  
१) शाळेचे व्यवस्थापन(Management) ... 
आपली शाळा ... ज्या प्रकारात आहे ती नोंद बिनचुक आहे का तपासुन पहा .. चुक असेल तर दुरुस्तीसाठी शिक्षणाधिकारी यांचेशी समक्ष संपर्क साधुन दुरुस्ती करुन घ्या .   
२) इयत्तानिहाय व तुकडीनिहाय ... अनुदान प्रकार .. अनुदानित .. अंशत: अनुदानित .. विना अनुदान कायम विनाअनुदान ... स्वयम अर्थसहाय्यीत .. तपासुन पहा व दुरुस्ती असेल तर दुरुस्ती आपण करु शकता ..
३)१-१-२०१८ रोजी आपली इयत्ता व तुकडीनिहाय पटसंख्या बिनचुक तपासुन पहा ... शाळा सोडुन गेलेले व नवीन दाखल झालेले विद्यार्थी आकडेवारी बिनचुक जुळणे आवश्यक आहे ...
4).  संच मान्यता महत्वाचे ,
आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गाचे इयत्ता निहाय व तुकडी निहाय Aid type संच मान्यतेमध्ये बरोबर असल्याची खात्री करावी. Aid type अनुदानित, अंशत: अनुदानित , विना अनुदानित , क़ायम विना अनुदानित तपासुन पहा चुकीचे असल्यास Master मध्ये जाऊन नंतर Division मेनूवर जाऊन चूकलेला Aid प्रकार बदलुन घ्यावा. प्रत्येक वर्गाचा Aid बरोबर असल्याची खात्री करूनच माहीती फ़ॉर्वर्ड करावी.
मुख्याध्यापकानी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तीसोबत बसुन या सर्व बाबीची खात्री करावी व नंतर फॉरवर्ड  करावी .. खात्री झाल्याशिवाय फॉरवर्ड  करु नये. आपण फॉरवर्ड केल्यानंतर केंद्रप्रमुख पुढील प्रक्रीया करतील . शाळेच्या चुकीच्या माहितीमुळे  होणाऱ्या नुकसानीस पुर्ण पणे मुख्याध्यापक जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी .