google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: सरल महत्त्वाचे
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Tuesday, 30 January 2018

सरल महत्त्वाचे


__________________________________________
*आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुकीच्या पोस्ट वाचून आपले नुकसान होऊ नये म्हणून ही पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

*सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,दिनांक ०१/०२/२०१८ पासून आंतर जिल्हा व दिनांक १५/०२/२०१८ पासून जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार आहे.त्या अनुषंगाने खालील सूचना लक्षात  घेणे गरजेचे आहे.*

👉 *आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बाबत सूचना*

➡ *१) आंतर जिल्हा बदली प्रक्रिया मध्ये मागील वर्षी ज्या शिक्षकांनी फॉर्म भरलेले आहेत,त्या पैकी ज्या शिक्षकांची टप्पा क्रमांक १ मध्ये बदली झालेली नाही अशाच उर्वरित शिक्षकांच्या फॉर्म चा समावेश करण्यात येणार असल्याने दिनांक ०१/०२/२०१८ पासून सुरू होणाऱ्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत नव्याने फॉर्म भरण्याची अथवा याआधी भरलेल्या फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा देण्यात येणार नाही हे लक्षात घ्यावे.बदली प्रणाली मध्ये याआधी save असलेल्या अर्जाच्या माहितीच्या आधारे बदली प्रक्रिया राबवण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.*

➡ *२) मागील वर्षी आंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरलेला आहे व त्यानंतर समायोजन,बदली इत्यादी काही कारणाने अर्जदार शिक्षक दुसऱ्या शाळेत रुजू झालेला असेल तर अशा शिक्षकांनी आपल्या भरलेल्या फॉर्म बद्दल अधिक काळजी करू नये.आपली शाळा बदलल्याने आपल्या आंतर जिल्हा प्रक्रियेवर काहीही परिणाम पडणार नाही हे लक्षात घ्यावे.*

➡ *३) संगणक प्रणाली द्वारे आंतर जिल्हा बदली टप्पा क्रमांक-२ पार पडल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.*

➡ *४) आंतर जिल्हा बदली टप्पा क्रमांक-२ मध्ये पेसा क्षेत्राचा विचार करण्यात येणार असून ज्या शिक्षकांनी आपला फॉर्म भरताना बदली साठी मागणी केलेल्या जिल्ह्याचे आपण स्थानिक ST आहोत असे नमूद केले असेल तर अशा शिक्षकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.*

👉 *जिल्हाअंतर्ग बदली प्रक्रिया-२०१८  बाबत सूचना*

➡ *५) जिल्हाअंतर्ग बदली प्रक्रिया-२०१८ दिनांक १५/०२/२०१८ पासून सुरू करण्यात येणार आहे.मागील वर्षी शिक्षकांनी भरलेले सर्व फॉर्म संवर्गनिहाय unverify करून देण्यात येणार आहे.ज्या शिक्षकांना मागील वर्षी भरलेल्या फॉर्म मध्ये काही बदल करावयाचा असेल तर ते इच्छित बदल करू शकतील.ज्यांना आपण भरलेल्या फॉर्म मध्ये काहीही बदल करावयाचा नाही अशा शिक्षकांनी आपला फॉर्म आहे तसाच वेरीफाय करावयाचा आहे.तसेच मागील वर्षी भरलेला फॉर्म आपणास Delete करावयाचा असेल तरी देखील आपण सदर फॉर्म delete करू शकणार आहात,हे लक्षात घ्यावे.तसेच मागील वर्षी फॉर्म न भरलेले शिक्षक देखील या वर्षी नव्याने फॉर्म भरू शकतील.*

➡ *६)या वर्षी पासून ज्या शिक्षकांनी आपला फॉर्म अंतिम मुदतीपर्यंत वेरीफाय केला नसेल तर सिस्टिम द्वारे प्राप्त माहितीच्या आधारे सदर फॉर्म अंतिम मुदतीनंतर ऑटो-वेरीफाय करून घेतला जाईल.अंतिम क्षणी सर्वर वर लोड आल्याने,इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने फॉर्म वेरीफाय करावयाचा राहून गेल्याच्या समस्या उद्भवू नये यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.*

➡ *७) या वर्षीपासून अवघड क्षेत्रातील असे क्षेत्र की ज्या ठिकाणी महिलांना सेवा करणे सोयीचे होणार नाही असे क्षेत्र मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या द्वारे घोषित केले जाणार आहे.आशा घोषीत केलेल्या ठिकाणी कोणत्याही महिलेला रँडम राउंड मध्ये बदली केली जाणार नाही.परंतु अशा ठिकाणी सेवा करावयाची इच्छा असलेल्या महिला शिक्षकाला मात्र आपली बदली अशा क्षेत्रात करून घेता येईल हे देखील लक्षात घ्यावे.तसेच अशा घोषित केलेल्या अवधड क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कोणत्याही महिला शिक्षक  कर्मचाऱ्याला संवर्ग-३ मध्ये बदली अधिकार प्राप्त होण्यासाठी ३ वर्षाच्या सेवेची अट क्षितील राहील,याची नोंद घ्यावी.*

➡ *८) संच मान्यता संदर्भात स्कूल,संच व student पोर्टल मध्ये असलेली शाळा व केंद्रप्रमुख स्तरावरून करावयाची कार्यवाही आज अखेर पूर्ण करावयाची आहे.अपूर्ण काम असणाऱ्या संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना कालच्या vc मध्ये मा.सचिव महोदयांनी दिलेल्या आहेत हे लक्षात घ्यावे. आपल्या स्तरावरील संच मान्यता विषयी असलेले सर्व अपूर्ण काम पूर्ण करून घ्यावे ही विनंती.*

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

No comments:

Post a Comment

If you have any doubts . please contact me.