google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Thursday, 4 January 2018

✅ *संचमान्यता* 2017-18 ✅

सर्व मुख्याध्यापक संच मान्यतेसाठी माहीती फ़ॉर्वर्ड साठी टॅब उपलब्ध झाला असून माहीती क्लस्टरला फ़ॉर्वर्ड करण्यापूर्वी महत्वाचे १७-१८ संच मान्यतेचा अंतिम टप्पा १ ते १५ जानेवारी या कालावधीत होत आहे ... या कालावधीत प्रत्येक मुख्याध्यापकाने खालील बाबी अत्यंत काळजीपुर्वक पहाणे आवश्यक आहे या वर्षी शाळेकडुन आलेली माहीती अंतिम समजुन  आदेश दिले जाणार आहेत .मा संचालक साहेबानी यापुर्वीच्या योग्य दुरुस्त्या करुन दिल्या आहेत . त्यामुळे यापुढे कोणतीही दुरुस्ती नंतर करुन दिली जाणार नाही ... त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे  
१) शाळेचे व्यवस्थापन(Management) ... 
आपली शाळा ... ज्या प्रकारात आहे ती नोंद बिनचुक आहे का तपासुन पहा .. चुक असेल तर दुरुस्तीसाठी शिक्षणाधिकारी यांचेशी समक्ष संपर्क साधुन दुरुस्ती करुन घ्या .   
२) इयत्तानिहाय व तुकडीनिहाय ... अनुदान प्रकार .. अनुदानित .. अंशत: अनुदानित .. विना अनुदान कायम विनाअनुदान ... स्वयम अर्थसहाय्यीत .. तपासुन पहा व दुरुस्ती असेल तर दुरुस्ती आपण करु शकता ..
३)१-१-२०१८ रोजी आपली इयत्ता व तुकडीनिहाय पटसंख्या बिनचुक तपासुन पहा ... शाळा सोडुन गेलेले व नवीन दाखल झालेले विद्यार्थी आकडेवारी बिनचुक जुळणे आवश्यक आहे ...
4).  संच मान्यता महत्वाचे ,
आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गाचे इयत्ता निहाय व तुकडी निहाय Aid type संच मान्यतेमध्ये बरोबर असल्याची खात्री करावी. Aid type अनुदानित, अंशत: अनुदानित , विना अनुदानित , क़ायम विना अनुदानित तपासुन पहा चुकीचे असल्यास Master मध्ये जाऊन नंतर Division मेनूवर जाऊन चूकलेला Aid प्रकार बदलुन घ्यावा. प्रत्येक वर्गाचा Aid बरोबर असल्याची खात्री करूनच माहीती फ़ॉर्वर्ड करावी.
मुख्याध्यापकानी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तीसोबत बसुन या सर्व बाबीची खात्री करावी व नंतर फॉरवर्ड  करावी .. खात्री झाल्याशिवाय फॉरवर्ड  करु नये. आपण फॉरवर्ड केल्यानंतर केंद्रप्रमुख पुढील प्रक्रीया करतील . शाळेच्या चुकीच्या माहितीमुळे  होणाऱ्या नुकसानीस पुर्ण पणे मुख्याध्यापक जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी .

No comments:

Post a Comment

If you have any doubts . please contact me.