google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: February 2024
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Thursday 29 February 2024

वणी केंद्राची एसएससी परीक्षा मार्च २०२४ ची आसनव्यावस्था जाहीर

 

के. आर. टी वणी, केंद्र क्रमांक ११७० साठी एसएससी परीक्षा २०२४ची आसन व्यवस्था जाहीर

केंद्र क्रमांक ११७०, के. आर. टी वणी साठी एसएससी परीक्षा २०२४ची आसन व्यवस्था आज जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाऊन आपला आसन क्रमांक पाहू शकतात.

केंद्र संचालक श्री शिंदे बी. व्ही. यांनी यावर्षीही एसएससी परीक्षा ही कॉपीमुक्त होणार आहे, असे सर्व पर्यवेक्षकीय सहविचार सभेत मार्गदर्शन करताना सांगितले. .

विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना:

  • विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि आवश्यक लेखन साहित्य सोबत आणणे आवश्यक आहे. 
  • परीक्षा केंद्रात गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल..

!! एसएससी परीक्षा २०२४ साठी शुभेच्छा !!









Thursday 22 February 2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा

"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या उपक्रमांतर्गत शासकीय तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या अनेक शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे।  राज्यातील जवळपास एक लाखाच्या वरती शाळांनी आपला सहभाग नोंदविला असून, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपांतर्गत माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेश पत्रामध्ये  माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकण्याचा व सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार, चांगल्या प्रतीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे असा या उपक्रमाचा उद्देश आहे. 

मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक विद्यार्थी यांचा सेल्फी
यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 


Saturday 17 February 2024

महावाचन उत्सव -2024

 महावाचन उत्सव उपक्रमामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांतून आपल्याला मिळालेली प्रेरणा किंवा शिकवण नेहमीच प्रेरणादायी ठरत असते.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील असेच काही महत्त्वाच्या प्रसंगांवर या ठिकाणी एक प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे. आपण ही प्रश्नावली सोडविण्याचा प्रयत्न करूया. 

प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले आहेत . यातील योग्य तो पर्याय निवडणे. जर आपल्याला 60%  च्या पुढे गुण मिळाले, तर तुम्हाला एक छानसे प्रमाणपत्र तुमच्या E- MAIL वर मिळेल. तुम्ही ते प्रिंट करून घेवू शकता. दररोज फक्त 60 प्रमाणपत्रे वाटप केली जातील. पुढील प्रमाणपत्रे दुसऱ्या दिवशी आपल्या E-MAIL वर पाठवली जातील. 

आपण ही प्रश्नावली कितीही वेळा सोडवू शकता.

खालील लिंकला क्लिक करून आपण ही प्रश्नावली सोडवू या. 



येथे क्लिक करा.


Thursday 15 February 2024

हनुमान जन्मस्थान संस्था, अंजनेरी ||


मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरीष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये ।। प्रभूश्रीरामचंद्रांचे-रामललांचे अयोध्येतील भव्य मंदिर होणे ही केवळ देशपातळीवरील नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक महान, दिव्य घटना आहे. श्रीराम म्हटल्यावर हात भक्तीभावाने जोडले जातात अन् लगेच श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये असे म्हणून त्याच भक्तीभावाने पुन्हा हात जोडले जातात. श्रीरामभक्त श्रीहनुमंतांचे असेच भव्य मंदिर त्यांच्या जन्मस्थळी अंजनेरी येथे व्हावे ही सर्व हनुमानभक्तांची तीव्र इच्छा आहे, अन् त्यासाठी नाशिक परिसरातीलच नव्हे तर सर्वदूरच्या हनुमान भक्तांनी हे भव्य मंदिर स्थापित करण्याचे ठरविले आहे.
 नाशिक हे केवळ धार्मिक क्षेत्र नव्हे तर एक आकर्षक पर्यटनकेंद्र झाले आहेच. या भव्य दिव्य श्रीहनुमान मंदिरामुळे पर्यटनकेंद्र म्हणून नाशिकचा लौकिक वाढणार आहे व या पर्यटनातून परिसराचा विकास होणार आहे. हनुमान जन्मस्थान जनजागृती उपक्रम आहे.

खालील लिंकला क्लिक करून आपण आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता.