मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरीष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये ।।
प्रभूश्रीरामचंद्रांचे-रामललांचे अयोध्येतील भव्य मंदिर होणे ही केवळ देशपातळीवरील नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक महान, दिव्य घटना आहे. श्रीराम म्हटल्यावर हात भक्तीभावाने जोडले जातात अन् लगेच श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये असे म्हणून त्याच भक्तीभावाने पुन्हा हात जोडले जातात. श्रीरामभक्त श्रीहनुमंतांचे असेच भव्य मंदिर त्यांच्या जन्मस्थळी अंजनेरी येथे व्हावे ही सर्व हनुमानभक्तांची तीव्र इच्छा आहे, अन् त्यासाठी नाशिक परिसरातीलच नव्हे तर सर्वदूरच्या हनुमान भक्तांनी हे भव्य मंदिर स्थापित करण्याचे ठरविले आहे.
नाशिक हे केवळ धार्मिक क्षेत्र नव्हे तर एक आकर्षक पर्यटनकेंद्र झाले आहेच. या भव्य दिव्य श्रीहनुमान मंदिरामुळे पर्यटनकेंद्र म्हणून नाशिकचा लौकिक वाढणार आहे व या पर्यटनातून परिसराचा विकास होणार आहे.
हनुमान जन्मस्थान जनजागृती उपक्रम आहे.
खालील लिंकला क्लिक करून आपण आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता.
No comments:
Post a Comment
If you have any doubts . please contact me.