BMI काढणे
- HOME
- ई - पाठ्यपुस्तके
- ABL शाळा
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- सरळ डाटाबेस
- थोर समाजसुधारक
- SSC Board
- गणितीय क्लुपत्या ( Tricks)
- महाराष्ट्रातील किल्ले
- शैक्षणिक ऐप्लिकेशन
- अकारिक नोंदी
- ऑनलाईन टेस्ट
- परिपत्रके (G R )
- पेसा अंतर्गत गावे
- २ ते १० चे संगीतमय पाढे
- शिष्यवृत्ती
- इंग्रजी व्याकरण
- 7 / 12 उतारा शोधा
- वार्षिक नियोजन
- घटक नियोजन
- PPT
- पायाभूत चाचणी
- ५ ते ८ वी स्काॅलरशीप
- आधार कार्ड
- MDM Aap
- विध्यार्थी लाभाच्या योजना
- BMI काढणे
- MAHADBT वेब साईट
- Online Shoping
- Contact Us
- Privacy Policy
- Disclaimer
- Terms and conditions
- School Gallery
- सामान्य ज्ञान : (General Knowledge. )
- !! इंग्रजी बोलूया !!
Saturday, 27 June 2026
Sunday, 8 February 2026
Use of 'made of' and 'made from'
"Made of" आणि "made from" हे दोन्ही वाक्यांमध्ये वस्तूच्या साहित्याबद्दल बोलताना वापरले जातात, पण त्यांचा फरक साहित्याच्या रूपात आहे.
Made of चा वापर"Made of" तेव्हा वापरतात जेव्हा मूळ साहित्याचे स्वरूप जवळजवळ तसेच राहते आणि ते ओळखता येते.
उदाहरण: "The table is made of wood."
(लाकूड दिसतेच आहे.)
Ring is made of gold.
(सोन्याचे स्वरूप दिसते.)
Made from चा वापर"Made from" तेव्हा वापरतात जेव्हा मूळ साहित्य पूर्णपणे बदलून रूपांतरित होते आणि ओळखता येत नाही.
उदाहरण: "Paper is made from wood."
(लाकूड कागद बनले, लाकूड दिसत नाही.)
"Wine is made from grapes."
(द्राक्षे द्राक्षारस बनले.)
मुख्य फरकMade of: साहित्य दिसते/तसेच राहते (visible/unchanged). �Made from: साहित्य बदलते/रूपांतरित होते (transformed). �
Sunday, 6 July 2025
Saturday, 7 June 2025
Monday, 12 May 2025
SSC Result 2025
दि. १३ मे २०२५ , दुपारी १:००
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)पुणे, यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या SSC 2025 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या.
2) https://sscresult.mahahsscboard.in/
Monday, 5 May 2025
12 वी चा निकाल . HSC result-2025
दि. ५ मे २०२५ , दुपारी १:००
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)पुणे, यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या HSC 2025 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या.
2) https://sscresult.mahahsscboard.in/
मोफत नवीन प्रवेश ( Free new admission)
चला तर जाणून घेऊया शाळेची काही खास वैशिष्टे .
आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करूया.
Friday, 2 May 2025
शाळेतील 'फोर हाऊस
*शाळेतील 'फोर हाऊस' म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांची चार गटात विभागणी. प्रत्येक गटाला एक नाव आणि एक विशेष रंग असतो. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना एक वेगळी ओळख मिळते आणि ते त्यांच्या गटाच्या नावाने ओळखले जातात.*
शाळा 'फोर हाऊस' प्रणालीचे फायदे:
संघभावना:
विद्यार्थ्यांना त्यांच्या गटासोबत काम करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांच्यात संघभावना वाढते.
स्पर्धा:
विविध कार्यक्रमांमध्ये गटांमध्ये स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते.
नेतृत्व विकास:
विद्यार्थ्यांना गटाचे नेतृत्व करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांच्यात नेतृत्व क्षमता विकसित होते.
वैशिष्ट्ये:
प्रत्येक गटाला विशिष्ट वैशिष्ट्ये दिली जातात, जसे की सातत्य, दृढता, चिकाटी, जबाबदारी, आदर, CMR National Public School नुसार .
शैक्षणिक विकास:
विद्यार्थ्यांना त्यांच्या गटासोबत शैक्षणिक कार्ये करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक ज्ञान वाढते.
सामाजिक विकास:
विद्यार्थ्यांना त्यांच्या गटासोबत विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांच्यात सामाजिक विकास होतो.
'फोर हाऊस' प्रणालीचे काही उदाहरण:
CMR नॅशनल पब्लिक स्कूल:
या शाळेत 'फोर हाऊस' प्रणाली आहे, जिथे विद्यार्थ्यांना चार गटात विभागले जाते, प्रत्येक गटाला एक नाव आणि एक रंग आहे. प्रत्येक गटाला विशिष्ट वैशिष्ट्ये दिली जातात आणि ते विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात.
ज्या शाळेत 'फोर हाऊस' प्रणाली आहे, जिथे विद्यार्थ्यांना फुलांच्या नावावर आधारित आठ गटात विभागले जाते.
'फोर हाऊस' प्रणाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप उपयुक्त आहे. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना एक वेगळी ओळख मिळते, त्यांच्यात संघभावना वाढते, नेतृत्व क्षमता विकसित होते आणि ते विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात, ज्यामुळे ते अधिक उत्साही आणि सक्रिय होतात.
Friday, 25 April 2025
स्कॉलरशिप निकाल
इयत्ता पाचवी व आठवीचा स्कॉलरशिप चा निकाल आत्ताच लागलेला आहे वरील लिंक वर चेक करू शकता👇
Tuesday, 25 March 2025
निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम
निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीच्या नोंदी
संदर्भ : शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७९/ एसडी-६, दिनांक: ०५ मार्च, २०२५.
Thursday, 27 February 2025
मराठीची जन्म कथा..
प्राकृत संस्कृत फारसी अरबी भले भले शब्द देशी विदेशी वैभवे तू महाराष्ट्रास नेशी माय मराठी तू कशी जन्मशी...
सप्तशतींची गाथा प्राकृतात प्रसवली भरजरी पितांबर सह्याद्रीस नेसविली प्राकृताची गोडी संस्कृताची प्रचुरता शब्दांची गुढता संत कवींनी वाढविली
विवेकाचा सिंधू उफाळून आला ज्ञानेशाची दीपिका भावार्थ साधला चरित्र लीळांचे माहीमभटा लिहिले मराठीचे बालपण त्यांनी पाहिले
नामदेव कीर्तनाचे रंगी नाचला निरक्षर चोखोबाने विठ्ठल वाचीला जनाबाईने श्रमातून विठ्ठल पूजीला शब्दा शब्दा मधून विठ्ठल वाहिला
मराठीचे दारात चिखल साठला महाराष्ट्र सारा परचक्राने पेटला भाषेत घुसली मग भाषा निराळी फारसी अरबी हड्डी मासी खिळली
दुर्ग झाले किल्ले खड्ग झाल्या तलवारी धोतराच्या झाल्या तुमानी परचक्रे किती आस्मानी सुल्तानी !
तशात रचली किती कवणे पुराने माय मराठीचे नव्या रूपात अवतरणे एकनाथी भागवत तुकोबांची गाथा किती नमवावा तया चरणी माथा !
मनाच्या श्लोकांचा दासाला बोध झाला बखरी शकावल्या जंत्र्या किती निर्मिल्या श्लोक आरत्या अभंग अन् भुपाळ्या मराठीच्या अंगावर अलंकार चढविला
लावणीचे लावण्य पोवाड्याचे धिटपण फटक्यांचे शहाणपण देवाचे निरूपण गीत संगीताने रूप सजले मराठीचे गुण गाई अभिजीत माय मराठीचे...
- अभिजीत घाडगे (8793884978)
Saturday, 1 February 2025
Tax calculator
See the comparisons of old and new tax scheme
( या मध्ये फक्त तुमचं वार्षिक उत्पन्न टाका जुन्या आणि नवीन टैक्स मधला फरक दिसेल )
नवीन करप्रणालीने बऱ्याच जणांचा गोंधळ झालेला दिसतोय, १२ लाखावर टॅक्स लागणार मग हे ४ लाखाच्या वर ५ % आणि असे टॅक्स स्लॅब का दिले आहेत? असं बरेच जण विचारतात. तुमचा देखील गोंधळ झाला असेल तर पूर्ण वाचा, समजून घ्या.
निव्वळ करपात्र उत्पन्न (Net Taxable Income) 12 लाख रुपयांपर्यंत असेल तर कोणताही कर लागू होणार नाही. पूर्वी 87A अंतर्गत करसवलतीची मर्यादा ₹७ लाख होती, ती आता ₹१२ लाख करण्यात आली आहे. तसेच, या सवलतीची कमाल रक्कम ₹२५,००० वरून ₹६०,००० करण्यात आली आहे.
१५ लाख कमावणाऱ्याला केवळ ३ लाखावर कर भरावा लागेल का?
:- नाही!
जर तुमचे उत्पन्न ₹१२ लाखांपेक्षा जरी १ रुपया जास्त असेल, तर तुम्हाला संपूर्ण उत्पन्नावर करप्रणालीनुसार कर भरावा लागेल. त्यासाठी खालील टॅक्स स्लॅब आणू उदाहरण बघा.
नवीन करस्लॅब:
₹० ते ₹४ लाख: शून्य कर
₹४ लाख ते ₹८ लाख: ५% कर
₹८ लाख ते ₹१२ लाख: १०% कर
₹१२ लाख ते ₹१६ लाख: १५% कर
₹१६ लाख ते ₹२० लाख: २०% कर
₹२० लाख ते ₹२४ लाख: २५% कर
₹२४ लाखांपेक्षा जास्त: ३०% कर
ही करसवलत फक्त पगार, व्यवसाय इत्यादी सामान्य उत्पन्नासाठी लागू असेल.
भांडवली नफा (Capital Gains) किंवा इतर विशेष उत्पन्नासाठी ही सवलत उपलब्ध नाही.
उदा. जर तुमचं इन्कम 13,00,000 असेल तर
0–4 lakhs: 0% → ₹0
4–8 lakhs: 5% on ₹4,00,000 → ₹20,000
8–12 lakhs: 10% on ₹4,00,000 → ₹40,000
12–13 lakhs: 15% on ₹1,00,000 → ₹15,000
Total Tax Payable = ₹75,000
अजून एक पगरावर 75,000 डीडक्शन मिळतं, त्यामुळे 12,75,000 पर्यंत टॅक्स लागणार नाही
Tuesday, 14 January 2025
52 वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा 2025
52 वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा 2025 सर्वांनी व्हिडिओचा शेवट जरूर पहावा कारण यामध्ये जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय श्री विनीत पवार सर यांची खास अशी एक मुलाखत घेतलेली आहे ती सर्वांनी जरूर पहावी.
Friday, 22 November 2024
अप्पार ID तयार करणे
अप्पार ID तयार करणे सोपे आहे. देशातील सर्व विद्यार्थ्यांना एकच आयडी असावा, असे शासनाने ठरविले असून, आता प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्वतंत्र एक युनिक आयडी तयार होणार आहे. अप्पार ID तयार करणे सोपे आहे.
हा अप्पार ID आयडी तयार कसा करायचा ?
हे आपल्याला खालील व्हिडिओ वरून सहज लक्षात येते,
Video 👉 APPAR ID GENERATE करणे.
Wednesday, 13 November 2024
PAT EXAM - 2024-25
PAT परीक्षा एक चे गुण नोंद तक्ते विषयवार आणि निकाल पत्रक आपण खालील प्रमाणे डाऊनलोड करू शकता
PAT LISTS
Saturday, 9 November 2024
RTE 25% admission Selection List / निवड यादी जाहीर
📝 *आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 करिता प्रवेश कसा निश्चित करावा❓| महत्त्वाच्या सूचना पहा*
👇 *RTE प्रवेशासाठी 31 जुलै पर्यंत मुदत*
*▪️RTE Selection list / निवड यादी डाउनलोड करा.*
https://bit.ly/RTE-25-percent-Admission-Process
🎯 ज्या बालकांची निवड यादीमध्ये प्रवेशासाठी निवड झाली आहे त्या बालकांच्या *पालकांनी दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत* पंचायत समिती / महानगरपालिका स्तरावरील *पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा.*
💥 *RTE 25% मोफत प्रवेश संपूर्ण माहिती - Online Application, आवश्यक कागदपत्रे, हमीपत्र, वयाची मर्यादा, पात्रता*
https://bit.ly/RTE-Admission-all-information
➡️ *Share with your friends*
Wednesday, 31 July 2024
Thursday, 11 July 2024
पायाभूत चाचणी 2024-25
मराठी भाषा सर्व इयत्तांच्या पायाभूत चाचणीच्या उत्तरपत्रिका
खालील इयत्ताना स्पर्श करून डाऊनलोड करू शकता.
मराठी उत्तरसूची
Wednesday, 10 July 2024
पायाभूत चाचणी
पायाभूत चाचणी
जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना व उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत*.
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा यांमधील इ ३ री ते ९वी या वर्गातील विद्यार्थांची प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयांसाठीची पायाभूत चाचणी दि १० ते १२ जुलै २०२४ या कालावधित होणार आहे . सदर चाचणी साठीच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरांपर्यंत पोहोच झालेल्या आहेत . शिक्षक सूचना व उत्तरसूची या परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संकेतस्थळावरील किंवा सोबत दिलेल्या लिंकवर जावून आपण शिक्षक सूचना व उत्तरसूची डाऊनलोड करून घेऊ शकता .याची माहिती आपले स्तरावरून आपल्या अधिनस्थ शाळांपर्यंत व शिक्षकांपर्यंत देण्यात यावी .
शिक्षकसूचना लगेच पाहता येतील मात्र उत्तरसूची या परीक्षा नियोजनाप्रमाणे १० जुलै रोजी प्रथम भाषा, ११ जुलै रोजी गणित आणि १२ जुलै रोजी तृतीय भाषा या विषयाप्रमाणे त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर प्रसिद्ध केल्या जातील .
शिक्षक सूचना पाहण्यासाठी लिंक 👉 https://drive.google.com/drive/folders/1AFsJ0symVCz8kg4iq-cmnCKLzO8wIJ_R?usp=drive_link
( राहूल रेखावार, भाप्रसे)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
Sunday, 16 June 2024
शिक्षक पदवीधर मतदारसंघ
महाराष्ट्र राज्य विधानपरिषद निवडणूक
मुंबई पदवीधर मतदारसंघ, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या विधानपरिषद निवडणुकांसाठी मतदार यादी जाहीर.
मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी येथे क्लिक करा.





