google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Technology A way of success
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Tuesday, 5 December 2017

student portal


संकलित गुण Online भरणे
 अ) संकलित गुण भरणे बाबत 1) संकलित चाचणी १ चे गुण अपलोड करण्यासाठी Mahastudent App सोमवारी प्ले स्टोर तसेच स्कुल लॉगीनला उपलब्ध करुन दिले जाणार आहे. २) प्रत्येक वर्गशिक्षकांना ते अॅप घेऊन संकलित १ चे गुण भरावयाचे आहे.
३) तत्पूर्वी मुख्याध्यापकांनी स्टुडंट पोर्टलमध्ये मुख्याध्यापक लॉगीन वरून Assign class teacher करून घ्यायचे आहे. त्यामध्ये गुरुजींना दिलेल्या वर्गाची तसेच गुरुजींच्या  मोबाईल नंबरची नोंद असणार आहे.
४) Assign class teacher केल्यास टिचर आयडी क्रियेट होतो तो गुरुजींना द्यायचा आहे. (सदरील प्रक्रिया आपण गतवर्षी केली आहे. फक्त गुरुजींकडील वर्ग व मोबाईल नंबरची खात्री करून टिचर आयडी लिहून घ्यावा.)
५) टिचर आयडी व मोबाईल क्रमांक टाकल्यास अॅप रजिस्टर होणार आहे.
६) अॅपमध्ये गुण विना इंटरनेट सेव करता येणार आहेत. इंटरनेट कनेक्शनने केंव्हाही अपलोड करता येतील.
 ७) अॅपमध्ये ४ प्रकारचे टॅब आहेत :
अ) student Attedendance -  यामध्ये चाचणीस अनुपस्थित विद्यार्थांना ✔ करुन सेव करायचे आहे.
ब) Submit Marks - यामध्ये प्रत्येक विद्यार्थाचे संकलित १ चे प्रश्ननिहाय गुण भरायचे आहेत व सेव करायचे आहेत. गुण विना इंटरनेटही सेव करता येणार आहेत.
क) sync information :- यामध्ये इंटरनेट सुविधेचा वापर करून गुण सरल सिस्टिमला पाठवू शकतो.
ड) Report - यामध्ये गुण भरलेला रिपोर्ट म्हणजे विद्यार्थी प्रगत / अप्रगत ते पाहता येणार आहेत.
८) याशिवाय पूर्वापार पद्धतीने म्हणजे excel sheet द्वारे computer वरून सुध्दा गुण भरता येणार आहेत पण अॅपने कामाला गती येईल व गुरुजींना वर्ग कोणत्या पातळीवर आहे ते मोबाईलवर लक्षात येईल.
ब)संचमान्यता
1) १००% शाळांनी दि. ०८ / १२ / २०१७ पर्यंत संच मान्यता पोर्टल मध्ये दि. ०१ / १० / २०१७ ची कार्यरत  मु. अ. / प्रा.प/. शिक्षक संख्या भरुन फायनलाईज करुन माहितीस्तव त्याची प्रिंट काढून ठेवावी.
2) स्टुडंट पोर्टलवरील संचमान्यता टॅबमध्ये आलेली वर्ग निहाय विद्यार्थी संख्या गोषवारा, हजेरी पत्रकातील विद्यार्थांशी जुळत असल्याची खात्री करून सदरील संख्या Forward for sanchmanyata ह्या नवीन टॅब द्वारे कें. प्र. यांना फॉरवर्ड करायचे आहे. टॅब पुढील आठवड्यात  येणार आहे.
३) फॉरवर्ड करण्या अगोदर प्रिंट काढून ठेवा.
४) सदरील संच मान्यता पोर्टल ची बाब पूर्ण झाल्या शिवाय डिसेंबरचे वेतन देयक स्विकारले जाणार नाहीत,
५) ज्या शाळेची संच मान्यता होणार नाही, त्या शाळेच्या मु. अ. ला जबाबदार धरले जाईल.
६ ) Remaining आधार बाबत : - सर्वांनी आपले रिमेनिंग आधार O येईपर्यंत अपलोड करावेत. सोमवारी सिस्टिम रिफ्रेश करुन आपले नव्याने किती रिमेनिंग आहेत, ते मंगळवारी पाहून रिमेनिंग O येईपर्यंत अपलोड करायचे आहेत.
७) तसेच सर्व HM नी नेहमी स्टुडंट पोर्टलवरील सर्व रिपोर्ट पाहून आपल्या शाळेची माहिती अपडेट ठेवावी.

Wednesday, 8 November 2017

तांत्रिक कारणामुळे इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा -२०१८ ची ऑनलाईन आवेदनपत्र दि. १४/११/२०१७ रोजी पासून सुरु करण्यात येतील

Tuesday, 7 November 2017

स्वच्छ विद्यालय, पुरस्कार:२०१७-१८

All schools are invited to apply for the awards.Registration opens from 1st September 2017 and closes on 15 th November 2017.


*शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक *




  • स्वच्छ विद्यालय पुरस्कार माहिती खालीलप्रमाणे भरावी.

Registration साठी येथे क्लिक करा .


 1.युडायस नंबर टाकावा. नंतर verification  करावे.

2.आपल्या शाळेचे नाव येते.  

3.माहिती भरणारा नाव    

4.पद -मुख्याध्यापक / प्रभारी शिक्षक  इतर                            

5.संपर्क - फोन नंबर -मोबाईल-ईमेल                        

6.शाळेचा प्रवर्ग -प्रा,/ प्रा.व उच्च प्रा.  शाळा स्थापन वर्ष -            

7.शाळा वर्ग  - मुले / फक्त मुली / मुले मुली                

8.वेळ - सिंगल / डबल      

9 .शाळा - ग्रामीण / शहरी      

10.व्यवस्थापन - शासन            

11.बोर्ड - स्टेट                      

12.विद्यार्थी संख्या - मुले + मुली

13.अपंग विद्यार्थी - मुले + मुली  

14.शिक्षकवृंद - पुरूष + स्ञी    

        सदरील माहिती सेव्ह करावी. त्यानंतर सहा  मुद्दे   प्रश्नावली च्या स्वरूपात माहिती भरावी. उदा.पाणी , शौचालय , हँन्डवाँश , कचरा व्यवस्थापन                  त्यामध्ये शेवटी फोटो अपलोड करावेत.एक प्रश्न सिलेक्ट करून एक एक पाच फोटो अपलोड करावेत . त्यानंतर सबमीट करावे. लगेच मेसेज येतो. तो तुमचा पासवर्ड राहिल.           सध्या फोटो उपलब्ध नसतील तर नंतर अपलोड करू शकता. मोबाईल नंबर टाकताना 0 घ्यावा,लँडलाईन नंबर आवश्यक आहे.

====================================

    स्पर्धा नोंदणी                               


      हा भाग खुप महत्वाचा
या बाबतच्या
     पाय-या पुढील प्रमाणे

❶     स्वच्छ विद्यालय पुरस्कार हे аpp
        प्ले स्टोर वरुन डाऊनलोड करा.
        किंवा
        070972 98400 या नंबर वर मिस्ड
        कॉल द्या аpps लिंक लगेच मिळेल.
        किंवा
        https://goo.gl/atAe69 या लिंक
        वरुन аpps download करुन घ्या

❷     ऑनलाइन आवेदन लॉग इन पासवर्ड
         मिळवणेकरीता अॅप्स वरुन
          किंवा
         वेबवरुन  http://mhrd.gov.in या साईट
         वरील मेनू ऑप्शन मध्ये स्वच्छ विद्यालय
         पुरस्कार वर क्लिक करुन रजिस्ट्रेशन
         करता येईल

❸      रजिस्ट्रेशन नंतर आपल्या मोबाइल वर
         मिळालेला पासवर्ड व यु डायस वापरुन
          लॉग इन करा

❹      लॉग इन केल्यानंतर दिलेल्या फॉर्म्यॅट
          नुसार ऑनलाइन सर्व्हे ची सर्व टॅब
          वरील माहीती अचूकपणे भरुन सेव
          करत सबमिट करा

❺       डाटा सर्व्हे फॉर्म्यॅट ला
         दिलेल्या टॅब वरुन डाऊनलोड करा
         लॉग इन करुन माहीती सबमिट
         करतांना या फॉर्म्यॅट वर माहीती भरुन
        ऑनलाइन माहीती भरतांना मदत मिळेल
               - - - - - - - - - - - - -उपरोक्त दिलेल्या माहीती मध्ये काही समजले नसल्यास किंवा काही अडचण असल्यास अधिक माहीती करीता हे गाईडलाईन्स डाऊनलोड करा
👇🏼
http://mhrd.gov.in/swachh-vidyalaya-puraskar-guidelines
   
           तर चला मग !                       लागू तयारीला ,

जर आपली शाळा असेल स्वच्छ व सुंदर तर मिळवून देवू या तीला तीचा सन्मान.....

                          🎓

          आमची शाळा
            स्वच्छ शाळा
   
       *राजिव म्हसकर *
 *शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नाशिक *

Monday, 30 October 2017

STAFF PORTAL

जिल्हांतर्गत बदलीपात्र परंतु अॉनलाईन फॉर्म नोंदणी न केलेल्या प्रलंबीत शिक्षकांची यादी. व मार्गदर्शक सुचना.◀


प्रति,
गटशिक्षणाधिकारी,
केंद्रप्रमुख ,
मुख्याध्यापक
अंतर्गत जि.प.नाशिक.

सरल जिल्हांतर्गत बदली ऑलनालईन पोर्टल ला येणा-या सर्व तांत्रीक समस्या राज्यस्तरावरुन सोडविण्यात आलेल्या आहेत. सदयास्थितीत सरल ट्रान्सफर पोर्टल आपल्या पुर्ण क्षमतेने सुरु असून नाशिक जिल्हयाकरीता संवर्ग-4 बदलीपात्र शिक्षकबांधवांना ऑनालाईन आवेदनपत्र भरण्याकरीताची अंतीम मुदत दिनांक-29.10.2017 रोजी (आज) सायं.05.00 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे. तदपुर्वीपर्यंत बदलीपात्र शिक्षकांनाी आपली आवेदनपत्रे भरणे बंधनकारक आहे. याबाबत यापुढे कसलीही मुदतवाढ मिळणे अपेक्षीत नाही याची नोंद घ्यावी.

अदयापही मराठी माध्यम- 316, ऊर्दु माध्यम - 42 जिल्हांतर्गत बदलीपात्र (TUC) शिक्षकांनी आपले आवेदन पत्रे ऑनलाईन पोर्टला न भरणे किंवा VERIFY केलेली नाहीत.अशाची यादी सोबत पाठविण्यात येत आहे. सदरील प्रलंबीत यादीमधील आपले आधिनस्त बदलीपात्र शिक्षक-मुख्याध्यापकांस आपलेस्तरावरुन तात्काळ संबधीताचा जिल्हांतर्गत बदलीचा ऑनालाईन फॉर्म भरणे बाबत सुचीत करावे.

दिलेल्या विहित मुदतीनंतर भरलेले फॉर्म सरल प्रणालीमार्फत नाकारण्यात येवून संबधीतांना संगणकीय प्रक्रीयेस (RANDOM ROUND) ला सामोरे जावे लागेल. कारणास्तव संबधीताची बदली जिल्हयातील कुठल्याही तालुक्यामधील शाळेवर होवू शकते असे याठिकाणी स्पष्ट पणे नमुद करण्यात येते.

करीता दिलेल्या अंतीम मुदतीपुर्वी प्रत्येक बदलीपात्र शिक्षकांनी ऑनालाईन आवेदनपत्र नोंदणी करावी.

जिल्हांतर्गत बदली फॉर्म भरतांना शाळास्तरावर येणा-या तांत्रीक अडचणी. जसे की- बदलीपात्र असूनही नांव न दिसून येणे. इ. बाबत मुख्याध्यापक अधिकृत ई-मेल वरुनegov.saral@gmail.com या शासनाच्या अधिकृत ई-मेल वर कळविण्यात यावे. तसेच त्यासंबधी लेखी अर्ज मुख्याध्यापक-गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत या कार्यालयास जमा करावेत.

उपरोक्त सुचनांची सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे कडुन तंतोतंत अंमलबजावणी अपेक्षीत आहे.

- राजीव म्हसकर,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद नाशिक.

STAFF PORTAL


जिल्हांतर्गत बदल्या:

बदलीपात्र TUC शिक्षकांनी अर्ज न कलेल्या तथा verify न केलेल्या शिक्षकांची संख्या 208+उर्दू 40 .....
Blockwise update
मराठी माध्यम
बागलाण 9,
चांदवड 5,
देवळा 5,
दिंडीरी 23,
इगतपुरी 7,
कळवण 6 , 
मालेगाव 8, उर्दू-38
नांदगाव 1,
नाशिक 3,
निफाड 10,
पेठ 14,
सिन्नर 2,
सुरगाणा 77,
त्रिम्बक 28,
येवला 8, उर्दू- 2
फॉर्म बाकी आहेत.

अजून website चालू असून आपल्या गटातील शिक्षकांचे फॉर्म verify करावेत.

Thursday, 28 September 2017