"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या उपक्रमांतर्गत शासकीय तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या अनेक शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे। राज्यातील जवळपास एक लाखाच्या वरती शाळांनी आपला सहभाग नोंदविला असून, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपांतर्गत माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेश पत्रामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकण्याचा व सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार, चांगल्या प्रतीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे असा या उपक्रमाचा उद्देश आहे.
BMI काढणे
- HOME
- ई - पाठ्यपुस्तके
- ABL शाळा
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- सरळ डाटाबेस
- थोर समाजसुधारक
- SSC Board
- गणितीय क्लुपत्या ( Tricks)
- महाराष्ट्रातील किल्ले
- शैक्षणिक ऐप्लिकेशन
- अकारिक नोंदी
- ऑनलाईन टेस्ट
- परिपत्रके (G R )
- पेसा अंतर्गत गावे
- २ ते १० चे संगीतमय पाढे
- शिष्यवृत्ती
- इंग्रजी व्याकरण
- 7 / 12 उतारा शोधा
- वार्षिक नियोजन
- घटक नियोजन
- PPT
- पायाभूत चाचणी
- ५ ते ८ वी स्काॅलरशीप
- आधार कार्ड
- MDM Aap
- विध्यार्थी लाभाच्या योजना
- BMI काढणे
- MAHADBT वेब साईट
- Online Shoping
- Contact Us
- Privacy Policy
- Disclaimer
- Terms and conditions
- School Gallery
- सामान्य ज्ञान : (General Knowledge. )
- !! इंग्रजी बोलूया !!
Thursday, 22 February 2024
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
Saturday, 17 February 2024
महावाचन उत्सव -2024
महावाचन उत्सव उपक्रमामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांतून आपल्याला मिळालेली प्रेरणा किंवा शिकवण नेहमीच प्रेरणादायी ठरत असते.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील असेच काही महत्त्वाच्या प्रसंगांवर या ठिकाणी एक प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे. आपण ही प्रश्नावली सोडविण्याचा प्रयत्न करूया.
प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले आहेत . यातील योग्य तो पर्याय निवडणे. जर आपल्याला 60% च्या पुढे गुण मिळाले, तर तुम्हाला एक छानसे प्रमाणपत्र तुमच्या E- MAIL वर मिळेल. तुम्ही ते प्रिंट करून घेवू शकता. दररोज फक्त 60 प्रमाणपत्रे वाटप केली जातील. पुढील प्रमाणपत्रे दुसऱ्या दिवशी आपल्या E-MAIL वर पाठवली जातील.
आपण ही प्रश्नावली कितीही वेळा सोडवू शकता.
खालील लिंकला क्लिक करून आपण ही प्रश्नावली सोडवू या.
Thursday, 15 February 2024
हनुमान जन्मस्थान संस्था, अंजनेरी ||
Thursday, 18 January 2024
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
याचे forms आपण खालीलप्रमाणे Download करून पाहू शकता . आवश्यक ती माहिती अगोदर तयार करून नंतर 2 MB पर्यंत आपले फोटो ( २ किंवा ३ ) PDF स्वरुपात तयार करून नंतर Upload करावे. केलेली माहिती आपण सेव Save करून ठेवा . याप्रमाणे आपण आपला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम पूर्ण करून नंतर तो Finalise करावा.
Sunday, 14 January 2024
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
माझी शाळा सुंदर शाळा चे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेबाबत...
सुंदर शाळा हा उपक्रम दिनांक 1 जानेवारी 2024 पासून ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत 45 दिवस हा उपक्रम राबवला जाणार आहे या अंतर्गत या शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन education .maharashtra.gov.in या वर जावून स्कूल पोर्टल मधून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यावर जाऊन शाळेचे रजिस्ट्रेशन सर्व शाळांनी करावयाचे आहे. यासंदर्भात सोबत व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ बघून त्यानुसार आपल्या शाळेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावयाचा आहे. तसेच हे रजिस्ट्रेशन करताना एक जानेवारीपासून तर आज पावतो आपण जे उपक्रम राबविले आहेत त्या उपक्रमांची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या मध्ये आपण राबवलेल्या उपक्रमांची माहिती नोंदवायची आहे व पीडीएफ स्वरूपात फोटो अपलोड करावयाचे आहेत तरी सर्व शाळांनी याबाबत कार्यवाही करावी परंतु हा 45 दिवसाचा उपक्रम असल्यामुळे फायनल सबमिट करू नये. 45 दिवसाचे आपल्याला दर आठवड्याला किंवा दररोज याची ऑनलाईन माहिती भरावयाची आहे. व उपक्रम संपल्यानंतर फायनल सबमिट करावयाचे आहे. आपण जर आजच फायनल सबमिट केले, तर सदर याच्यावर आपल्याला माहिती भरता येणार नाही.
तरी सर्वांनी याची काळजी घ्यावी आणि हा उपक्रम माननीय मुख्यमंत्री यांचा असल्याकारणाने याचा दर आठवड्याला आढावा घेतला जाणार आहे, त्यामुळे या उपक्रमाच्या संदर्भात जो शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयाप्रमाणे शाळा स्तरावर 45 दिवस उपक्रम राबवून ऑनलाइन त्याची दर आठवड्याला नोंदणी करावयाची आहे. आपण दर गुरुवारी आपल्याला अहवाल द्यायचा असल्याने आपण आठवडाभरातले सर्व उपक्रम गुरुवारपर्यंत नोंदवायचे आहेत, तर या सूचनेची सर्वांनी नोंद घ्यावी.
या उपक्रमा संदर्भात विविध अधिकारीभेटी देऊन पाहणी होणार आहे तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांना याबाबत माहिती आहे का हे तपासणार आहेत.सर्व मुख्याध्यापक यांनी याबाबत च्या शासन निर्णयाचे प्रिंट काढून त्याचे शिक्षक सभा घेऊन वाचन करून घ्यावे व त्यावर सर्व शिक्षकांची स्वाक्षरी घ्यावी.
तसेच या उपक्रमात शाळांना रँकिंग देऊन शाळांना पारितोषिक देखील दिले जाणार आहे. तरी या उपक्रमाची अंमलबजावणी सर्वांनी नियमित करावी. उद्यापासून शाळचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात करावी .आपण रजिस्ट्रेशन केले की नाही हे BEO लॉगिन वर दिसणार आहे.
**********
खालील व्हिडिओ पाहून आपण शाळा रजिस्ट्रेशन करू शकता ..
Monday, 1 January 2024
शिक्षणाबद्दल संपूर्ण माहिती
प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच आपले व्यक्तिमत्व घडवण्यासही मदत होते. शालेय शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात मोठी भूमिका बजावते. संपूर्ण शिक्षण प्रणाली प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण अशा तीन भागांमध्ये विभागली गेली आहे. शिक्षणाच्या सर्व स्तरांना स्वतःचे विशेष महत्त्व आणि स्थान आहे. आपल्या मुलांना यशाच्या दिशेने जाताना आपल्या सर्वांना पहायचे आहे, जे केवळ चांगल्या आणि योग्य शिक्षणानेच शक्य आहे.
शिक्षणाचे महत्त्व (Importance of education in Marathi)
आजच्या समाजात शिक्षणाचे महत्त्व खूप वाढले आहे. शिक्षणाचे उपयोग अनेक आहेत पण त्याला नवी दिशा देण्याची गरज आहे. शिक्षण असे असले पाहिजे की माणसाला त्याच्या वातावरणाची ओळख होईल. आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हे अत्यंत आवश्यक साधन आहे. शिक्षणाच्या या साधनाचा उपयोग करून आपण आपल्या जीवनात काहीही चांगले साध्य करू शकतो.
उच्च पातळीचे शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर आणि एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. शिक्षणाचा काळ हा प्रत्येकासाठी सामाजिक आणि वैयक्तिकरित्या खूप महत्त्वाचा काळ असतो, यामुळेच आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे.

