google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: July 2017
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Wednesday 26 July 2017

जिल्हा परिषदेच्या शाळातील सर्व शिक्षकांसाठी सुचना -



जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रकरणी शासन निर्णय क्र.जिपब.४८१७/प्र.क्र.७/आ १४,दिनांक २७/०२/२०१७,शासन शुद्धीपत्रक दि.१५/०४/२०१७,१७/०५/२०१७ आणि ३१/०५/२०१७ अन्वये सुधारित धोरण निश्चित केलेले आहे.त्यानुसार जिल्हा परिषद बीड,लातूर,जालना,सोलापूर आणि परभणी या जिल्हा परिषदेमधील विशेष संवर्ग भाग-२ मधील नमूद असणाऱ्या शिक्षकांसाठी अर्ज भरण्याची सुविधा दि.२१/०७/२०१७ रोजी दु.२.०० पासून बंद करण्यात येत आहे.
आता नाशिक,जळगाव,धुळे,नंदुरबार,पुणे,सातारा,कोल्हापूर,सांगली,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी व सिधुदुर्ग या जिल्हा परिषदामधील विशेष संवर्ग भाग-२ मधील नमूद असणाऱ्या शिक्षकांसाठी शुक्रवार दि.२१/०७/२०१७ रोजी दु.२.०० वा.पासून दि.२५/०७/२०१७ रोजी दु. ४.०० वा.पर्यंत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
एकदा माहिती भरून ती अंतिम (Verify) झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत त्यामध्ये बदल करण्याची संधी दिली जाणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी.सदर जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे सरल प्रणालीवरील नोंदी अर्ज भरण्यापूर्वी Update करण्याची संपूर्ण जबाबदारी गटशिक्षणाधिकारी यांची राहील याची नोंद घ्यावी.केवळ नोंदी Update नाहीत म्हणून कोणत्याही उमेदवारास अर्ज भरण्यास अडचण येणार नाही याची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.

Monday 17 July 2017

जिल्हाअंतर्गत बदली बाबत


__________________________________________
♦ *जिल्हाअंतर्गत बदली बाबत महत्वाच्या सूचना*♦ __________________________________________

*दि.१५/०७/२०१७ पासून विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ अंतर्गत असणाऱ्या शिक्षकांना जिल्हा अंतर्गत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.या सुविधेअंतर्गत आपण फॉर्म भरून वेरीफाय करून ठेवू शकाल.मात्र वेरीफाय केलेल्या फॉर्म ची अचूक प्रिंट काही तांत्रिक अडचणीमुळे आपणास उद्या दुपारी १२ वाजेनंतर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केली जाणार आहे याची नोंद घ्यावी.त्यामुळे उद्या दुपारपर्यँत आपण  वेरीफाय केलेला फॉर्म डाउनलोड करू नये.मात्र दुपारनंतर सदर फॉर्म ची verify असलेली self certified  प्रिंट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढणे बंधनकारक आहे.कारण हीच प्रिंट आपणास योग्य त्या कागदपत्रासह पडताळणी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी व मु.का.अधिकारी यांच्याकडे सादर करावयाच्या सूचना देण्यात येणार आहे.*

🚻 *विशेष शिक्षक संवर्ग भाग मध्ये कोणते कर्मचारी येतात?*

➡ *ज्या शिक्षक कर्मचाऱ्याचा जोडीदार हा त्याच्या शाळेपासून ३० कि.मी पेक्षा अधिक अंतरावर कार्यरत आहे.असेच शिक्षक या संवर्गात अंतर्भूत होतात.अशाच शिक्षकांनी विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ अंतर्गत उपलब्ध करून दिलेला फॉर्म भरणे अपेक्षित आहे.*

➡ *तसेच ३० कि.मी पेक्षा कमी अंतर असणारे पती पत्नी यांचा समावेश या संवर्गात होत नाही .या शिक्षकांच्या बदली संदर्भात किंवा बदलीसाठी फॉर्म भरावयाच्या कार्यवाही संदर्भात शासन निर्णयाचे अवलोकन करावे.अशा शिक्षकांसाठी यथावकाश सूचना देण्यात येतील तेंव्हा त्यांनी फॉर्म भरावे.*

➡ *निरीक्षणानंतर असे लक्षात आले आहे की ३० की.मी पेक्षा कमी अंतर असणारे शिक्षक देखील विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ मध्ये फॉर्म भरत आहेत जे पूर्णपणे चुकीचे आहे.अशा सर्व शिक्षकांना सूचित करण्यात येत आहे की,कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा चुकीच्या पद्धतीने आपण फॉर्म भरू नये.आपल्या जोडीदाराच्या शाळेपासूनचे अंतर फॉर्म पडताळणी करताना अतिशय काटेकोरपणे तपासले जाणार आहेत.त्यावेळी चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभुल केल्याचे लक्षात आल्यास अशा अर्जदारावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आहेत.*

➡ *विशेष शिक्षक सवर्ग  भाग-२ अंतर्गत ज्या पती पत्नीच्या शाळेमधील अंतर ३० की.मी.पेक्षा जास्त आहे असे ग्रुहीत धरून ट्रांसफर पोर्टल मध्ये फॉर्मची रचना तयार करण्यात आलेली आहे.जे पती पत्नी दोघेही जि.प.च्या शाळांमध्ये कार्यरत आहेत व त्यांच्या शाळेमधील अंतर ३० की.मी.पेक्षा जास्त आहे अशा शिक्षकांची बदली करताना सिस्टीम मध्ये प्रत्यक्ष किलोमीटरची आवश्यकता भासणार असल्याने अशाच कर्मचा-यांना ते अंतर नमूद करण्याची सुविधा फॉर्ममध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.*

➡ *जि.प.शाळेव्यतिरिक्त इतर कार्यालयात सेवेत असणाऱ्या कर्मचा-याच्या बाबतीत प्रत्यक्ष अंतर घेण्याची आवश्यकता भासणार नसल्याने व विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ मध्ये ३० की.मी पेक्षा जास्त अंतर असणाऱ्याच शिक्षकांनी फॉर्म भरणे अपेक्षित असल्याने अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत फॉर्म भरताना अंतराची नोंद करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.परंतू जे कर्मचारी जोड़ीदाराच्या ठिकानापासून ३० की.मी पेक्षा कमी अंतरामध्ये कार्यरत आहेत असे  शिक्षक सुद्धा ट्रांसफर पोर्टलमध्ये फॉर्म भरत आहेत असे लक्षात आले आहे. जे पूर्णपणे चुकीचे आहे.अशा पद्धतीने फॉर्म भरता येऊ नये म्हणून अशा शिक्षकांसाठी देखील आपल्या जोड़ीदाराच्या ठिकाणाचे अंतर नमूद करण्याची सुविधा विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ चा फॉर्म भरताना दि.१७/०७/२०१७  दुपारी 2 वाजलेपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.*

➡ *वेगवेगळ्या जिल्ह्यात असणारे पती-पत्नी विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ अंतर्गत फॉर्म भरण्यासाठी पात्र आहेत अशा अर्थाच्या पोस्ट whatsapp ग्रुप वर येत असल्याचे दिसून आले आहे.तरी अशा पोस्ट वर विश्वास ठेवू नये.सदर बदली प्रक्रिया ही जिल्हाअंतर्गत बदली साठी असल्याने एकाच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यासाठी उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी.वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या पति-पत्नी या सुविधेमध्ये फॉर्म भरू शकत नाही हे लक्षात घ्यावे.*

➡ *महत्वाची सूचना:* *या पोस्ट द्वारे अशी सूचना देण्यात येते की,वरील कारणास्तव सध्या विशेष शिक्षक सवर्ग भाग-२  अंतर्गत पती-पत्नी दोघेही जि.प.शाळेत कार्यरत आहेत अशाच प्रकारच्या शिक्षकांनी ट्रांसफर पोर्टलमध्ये फॉर्म भरावेत.इतर कार्यालयात आपला जोडीदार कार्यरत असेल आणि आपणास संवर्ग-२ मधून फॉर्म भरावयाचा असेल तर आपण उद्या दुपारी १२ पर्यंत फॉर्म भरू नये.कारण आता आपणास या फॉर्म मध्ये अंतर नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.*

➡ *आजपर्यंत दिवसभरात इतर प्रकारातील ज्या  कर्मचाऱ्यानी आपल्या जोडीदाराच्या कार्यालयाच्या अंतराची नोंद न करता फॉर्म भरले आहेत अशा कर्मचा-याचे फॉर्म जरी व्हेरिफाय झालेले असतील तरी त्यांच्या जोडीदाराच्या कार्यालयाच्या अंतराची नोंद करण्याकरीता हे सर्व फॉर्म सिस्टिम द्वारे अनवेरीफाय करून अपडेट करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.अशा शिक्षकांनी आपल्या फॉर्ममध्ये सोमवार दि.१७/०७/२०१७ सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा आपले फॉर्म बदली साठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.*

➡ *विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ मध्ये फॉर्म भरताना आपल्या जोड़ीदाराच्या शाळेचे/ कार्यालयाचे अंतर हे ३० की.मी.पेक्षा जास्त असेल तरच आपण फॉर्म भरावा.चुकीचे अंतर दर्शवून फॉर्म भरणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.*

➡ *शासन निर्णयात उल्लेख केल्याप्रमाणे इतर कार्यालात /संस्थेत असणारा आपला जोडीदार हा त्या कार्यालयातील सेवेत कायम असणे गरजेचे आहे.बदलीसाठी सवलत मिळावी म्हणून तात्पुरत्या/हंगामी स्वरूपात कामाला असणाऱ्या आपल्या जोड़ीदाराच्या सेवेचा बदलीसाठी फायदा घेता येणार नाही.आपल्या जोडीदाराच्या कार्यालयाच्या बाबतीत चुकीची माहिती देवून शासनाची फसवणूक केल्यास अशा कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. परंतु,जि.प.शाळेत कार्यरत असलेला आपला जोडीदार जर शिक्षण सेवक अथवा स्थायित्व लाभ न मिळालेला (हंगामी कर्मचारी) असेल तरीही आपण विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मध्ये फॉर्म भरू शकाल.*

➡ *ज्या शिक्षकांची या महिन्यात आंतर जिल्हा बदली झालेली आहे व अशा शिक्षकांना अद्याप नवीन जिल्ह्यांनी पदस्थापना दिलेली नाही,अशा शिक्षकांच्या जोडीदाराला विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ अंतर्गत फॉर्म भरता येईल का? अशी विचारणा सारखी होत आहे,तरी या पोस्ट द्वारे अशा शिक्षकांना सूचित करण्यात येत आहे की,अशा शिक्षकांच्या जोडीदाराला विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ अंतर्गत फॉर्म भरता येणार नाही.*

➡ *परंतु ज्या शिक्षकांची या वर्षी आंतर जिल्हा बदली झालेली आहे व अशा शिक्षकांना पदस्थापणा देखील मिळालेली आहे आणि या पदस्थापनेचे ठिकाण जर आपल्या जोडीदाराच्या शाळेपासून/कार्यालयापासून ३० कि.मी पेक्षा अधिक दूर असेल तर   अशा आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचा जोडीदार (जो पूर्वीपासून याच जिल्ह्यात कार्यरत आहे)हा विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली मध्ये फॉर्म भरू शकतो.परंतु काही शिक्षकांच्या बाबतीत पति-पत्नी दोघांचीही याच वर्षी आंतरजिल्हा बदली झालेली आहे अशा शिक्षकांना मात्र या संवर्गात आपला फॉर्म भरता येणार नाही.*

➡ *विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ साठी फॉर्म भरण्यासाठी सेवा किती वर्ष होणे गरजेचे आहे याबाबत कोणतीही अट नाही.परंतु जर आपण विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मध्ये येत असाल आणि आपल्यापैकी एकाची/दोघांची सलग सेवा सोपे क्षेत्रांत १० वर्षे पेक्षा अधिक झालेली असेल (म्हणजेच आपण बदली पात्र असाल) तरी देखील आपण विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मध्ये फॉर्म भरलेला नसेल अशा वेळी बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी आपली जागेवर अधिकार सांगितला तर आपली व आपल्या जोडीदाराची बदली होऊ शकते याची नोंद घ्यावी.*

➡ * विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ च्या कर्मचाऱ्यांना बदलीस नकार देण्याचा कोणताही अधिकार व ट्रान्सफर पोर्टल मध्ये तशी सुविधा देखील देण्यात आलेली नाही व दिली जाणारही नाही याची नोंद घ्यावी*

➡ *३० कि.मी अंतराची जी अट देण्यात आलेली आहे ते अंतर हवाई अंतर नसून आपल्या जोडीदाराच्या शाळेच्या/कार्यालयाला जाणाऱ्या जवळच्या रस्त्याचे आहे हे लक्षात घ्यावे.*

➡ * विशेष शिक्षक संवर्ग-१ साठी फॉर्म भरताना त्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांना जर बदली हवी असेल तर त्यांना ट्रान्सफर पोर्टल मध्ये फॉर्म भरण्याची आवश्यकता आहे याची नोंद घ्यावी.जर त्यांना बदली नलो असल्यास देखील ट्रान्सफर पोर्टल मध्ये त्यांनी नकार नोंदवण्यासाठी फॉर्म भरणे गरजेचे आहे.तसे न केल्यास त्यांच्या जागेवर इतर शिक्षकांची बदली झाल्यास त्यांची इतर ठिकाणी बदली होऊ शकते.*

➡ *टीप: विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मध्ये काही महत्त्वाचे बदल होणार असल्याने फॉर्म कसा भरावा यासाठीचे आज उपलब्ध होणारे मॅन्युअल उद्या दुपारी १२ वाजता आमच्या* pradeepbhosale.blogspot.in *या ब्लॉगवर व ट्रान्सफर पोर्टल वर download करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.*
*धन्यवाद....*

Thursday 13 July 2017

जिल्हाअंतर्गत बदली

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *१०६२*
*दिनांक* : *१३/०७/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली अंतर्गत विशेष संवर्ग भाग १ साठी चा फॉर्म भरण्याची सुविधा बंद करून विशेष संवर्ग भाग २  साठी बदली फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत महत्वाची सूचना* __________________________________________

*विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली साठी सरल ट्रान्सफर पोर्टल मध्ये उपलब्ध असलेली सुविधा उद्या सायं ४ वाजता बंद करण्यात येणार आहे.तसेच उद्या सायं ४ वाजेपासून जालना,सोलापूर,बीड,परभणी,लातूर विशेष संवर्ग भाग २ अंतर्गत असलेल्या शिक्षकांना जिल्हाअंतर्गत  बदली फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.विशेष संवर्ग भाग २ साठी असलेली ही सुविधा दिनांक १७/०७/२०१७ पर्यंत उपलब्ध असेल.या नंतर कोणत्याही परिस्थिती मुदतवाढ मिळणार नाही हे लक्षात घ्यावे.*
*सदर सुविधा इतर जिल्ह्यांसाठी देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.*

Wednesday 5 July 2017

Inspire Award -2017-18

*महत्वाची नोंदणी*

*Inspire Award 2017 -18*

सर्व मुख्यद्यापाक, शिक्षक यांना सूचित करण्यात सत्र 2017-18 मध्ये आयोजित होणाऱ्या inspire award प्रदर्शनी करिता वर्ग 6 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांची नोंदणी सुरु झाली आहे ( प्रत्येक वर्गातून एक )

*नोंदणी :- 1 एप्रिल 2017 ते 15 सप्टेंबर  2017*

👍 आवश्यक कागदपत्रे
   👍 शाळेचा लॉगिन id व पासवर्ड

*विद्यार्थ्यांचे व वडिलांचे पूर्ण नाव*
1. विद्यार्थ्यांचा फोटो
2. आधार कार्ड न.
3. बँक खाते क्रमांक
4. मोबाईल नं व इमेल
5. जन्म दिनांक व जात प्रवर्ग
6. मार्गदर्शक शिक्षक नाव
7. प्रकल्पाचे नाव
8. प्रकल्पाचे विषय
      A) Digital India
      B) Make in india
      C) Skill india
       D) Swachh Bharat
       E) Sawasth Bhatat
       F) Others
9. @ 300 शब्दामध्ये प्रकल्पाची माहिती
        ( सर्व माहिती इंग्रजी मध्ये )
10. Synopsis ( स्कॅन कॉपी )

*टीप :- सर्व शाळांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे,*

👍 जर शाळेचा login id व Password विसरला तर one time registration करून लॉगिन id व पासवर्ड रिसेट करावा,
             -  आर पी पाटील , उपशिअ, माध्यमिक , नाशिक

Sunday 2 July 2017

saral

*सरल बाबत*महत्वाचे *सध्या mdm बद्दल* 🌎App नव्याने इन्स्टॉल करताना otp येत नाही 🌎Closing balance aprove होत नाही फक्त एकच धान्य दाखवत आहे 🌎या पूर्वीचे महिन्याचा closing स्टॉक दिसत नाही फक्त एप्रिल 17 पासूनच दिसतो 🌎Kp लॉगिन मधून मागील महिन्यांचे बिल व टाटांनी संख्या जनरेट होत नाही *वरील सर्व अडचणी थोड्याफार फरकाने आपल्या सध्या mdm बाबत येत असतील येत्या काही दिवसात या अडचणी सोडविल्या जातील* 🌹🌹🌹 *Student पोर्टल बाबत* 🌎या पोर्टलमध्ये सध्या प्राधान्याने 1 ते 8 चे प्रमोशन करायचे आहे (manualy) 🌎विद्यार्थी transfer ,update, request या सर्व टॅब यथावकाश देण्यात येतील 🌎इयत्ता 1लि च्या वर्गातील मुलांची नव्याने माहिती भरायची आहे त्यासाठी यथावकाश सुविधा दिली जाणार आहे 🌎विद्यार्थी प्रमोशन करताना आपल्या शाळेतील सर्वात वरच्या वर्गातील विद्यार्थी त्यापुढील वर्गात प्रमोट होतील परंतु त्यांची division *unknown* अशी असेल म्हणजेच ते विद्यार्थी आपल्या शाळेत तर दिसतील परंतु आपल्या student कॅटलॉग किंवा संचमान्यतेत काउन्ट होणार नाहीत व student transfer च्या वेळी समोरच्या शाळेला ते request पाठविण्यासाठी दिसतील व आपण request aprove केल्यावर ते सर्व विद्यार्थी शाळेतून निघून जातील 🌹🌹🌹🌹🌹🌹 *Staff पोर्टल बाबत* 🌎यात सध्या अतिम्हत्वाचे काम आपल्याला करायचे आहे आपली प्रत्येक शिक्षकाची माहिती अपडेट करायचू आहे *staff पोर्टल वरील माहिती अपडेट असल्याशिवाय आपल्याला ट्रान्सफर पोर्टल मध्ये बदली अर्ज करता येणार नाही* हे लक्षात ठेवावे 🌎staff पोर्टल मधील सर्वच माहिती अपडेट असावी परंतु किमान personal and pay details हा एक टॅब अपडेट असेल तरी आपण ट्रान्सफर पोर्टल मध्ये बदली अर्ज करू शकतो 🌎तसंच staff पोर्टल मधील भरलेली माहिती kp लॉगिन वरून verify केली असणे आवश्यक आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹 *School पोर्टल बाबत* सध्यातरी स्कूल पोर्टल मध्ये काम करणे बाबत स्पष्ट सूचना नाहीत यथावकाश कळविले जाईल 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽