google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: जिल्हा परिषदेच्या शाळातील सर्व शिक्षकांसाठी सुचना -
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Wednesday, 26 July 2017

जिल्हा परिषदेच्या शाळातील सर्व शिक्षकांसाठी सुचना -



जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रकरणी शासन निर्णय क्र.जिपब.४८१७/प्र.क्र.७/आ १४,दिनांक २७/०२/२०१७,शासन शुद्धीपत्रक दि.१५/०४/२०१७,१७/०५/२०१७ आणि ३१/०५/२०१७ अन्वये सुधारित धोरण निश्चित केलेले आहे.त्यानुसार जिल्हा परिषद बीड,लातूर,जालना,सोलापूर आणि परभणी या जिल्हा परिषदेमधील विशेष संवर्ग भाग-२ मधील नमूद असणाऱ्या शिक्षकांसाठी अर्ज भरण्याची सुविधा दि.२१/०७/२०१७ रोजी दु.२.०० पासून बंद करण्यात येत आहे.
आता नाशिक,जळगाव,धुळे,नंदुरबार,पुणे,सातारा,कोल्हापूर,सांगली,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी व सिधुदुर्ग या जिल्हा परिषदामधील विशेष संवर्ग भाग-२ मधील नमूद असणाऱ्या शिक्षकांसाठी शुक्रवार दि.२१/०७/२०१७ रोजी दु.२.०० वा.पासून दि.२५/०७/२०१७ रोजी दु. ४.०० वा.पर्यंत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
एकदा माहिती भरून ती अंतिम (Verify) झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत त्यामध्ये बदल करण्याची संधी दिली जाणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी.सदर जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे सरल प्रणालीवरील नोंदी अर्ज भरण्यापूर्वी Update करण्याची संपूर्ण जबाबदारी गटशिक्षणाधिकारी यांची राहील याची नोंद घ्यावी.केवळ नोंदी Update नाहीत म्हणून कोणत्याही उमेदवारास अर्ज भरण्यास अडचण येणार नाही याची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.

No comments:

Post a Comment

If you have any doubts . please contact me.