google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: सरल पोर्टल विषयी
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Thursday, 17 August 2017

सरल पोर्टल विषयी



आज दि. 14 ऑगस्ट रोजी सरल संदर्भात अत्यंत महत्त्वाची Video Conference घेण्यात आली. यातील प्रमुख मुद्दे खालील प्रमाणे आहेत.

📌 Student Portal.

1. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत Student Promotion हे Manually करावे लागणार आहे.

2. वर्ग 9 वी आणि 11 वीचे Promotion करतांना विद्यार्थी टक्केवारी टाकावी लागणार तसेच नापास विद्यार्थ्यांचा कोणता विषय नापास आहे तो देखील टाकावा लागणार. त्यापूर्वी सन 2015-16 मधील व त्यापुढील वर्षांचे फक्त राहिलेल्या विद्यार्थ्यांचे Promotion करावे लागणार तेव्हाच पुढील Promotion होणार.

3. इयत्ता 10 वीचे विद्यार्थी Promotion करत असताना SSC Board कडून Auto गुण घेतले असून ते गुण कमीजास्त असल्यास Edit करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

4. मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील Attach Student ही सुविधा उपलब्ध असून यावर्षी आपण Multiple Request पाठवू शकणार.

5. Request Approve करत असताना एका वेळी फक्त 5 Request Approve कराव्यात जेणेकरून Server वर अतिरिक्त ताण येणार नाही.

6. सात दिवसापर्यंत Request Approve न केल्यास Request  यावर्षी गटशिक्षणाधिकारी लॉगिन ला न जाता केंद्रप्रमुख यांच्या लॉगिन ला जाणार. केंद्रप्रमुख यांच्या लॉगिन वरून Request Approve अथवा Reject होणार.

7. यावर्षी केंद्रप्रमुख यांना Student Portal चे लॉगिन उपलब्ध असणार असून या लॉगिन वरूनच संच मान्यतेसाठी ग्राह्य विद्यार्थी संख्या गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला जाणार आहे.

8. Out of School, Create Division या सर्व सुविधा मागीलप्रमाणे उपलब्ध राहणार.

9. सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक जोडावे लागणार. आधार क्रमांक असणाऱ्या विद्यार्थ्यांचा Data हा संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात येणार.

10. इयत्ता पहिली चे विद्यार्थी मागील वर्षाप्रमाणे ऑफलाईन माहिती भरून Upload करता येणार.

📌 Student Portal Second Phase

Student Portal Second Phase ही एक नवीन संकल्पना असून यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या Update Student Data या Tab वर Click केले असता आपणास त्या विद्यार्थी संदर्भात खालील प्रमाणे माहिती भरावयाची आहे. यात आपणास विद्यार्थी नावातील बदल देखील करता येणार आहेत.

A) Personal Details.
B) Disability.
C) Birth Information.
D) Family Details.
E) Address Details.
F) Bank Details.

या सर्व माहितीच्या आधारे त्या विद्यार्थ्यांचे Leaving Certificate हे ऑनलाईन मिळणार असल्याने ही सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.

📌 School Portal.

School Portal वरील माहिती भरून पूर्ण करावी. या पोर्टल वरील माहिती ही अत्यंत महत्वाची असून हीच माहिती इतर पोर्टल वर Reflect होत असल्याकारणाने सदर माहिती काळजीपूर्वक भरावी. या पोर्टलवर होणारी वर्गवाढ, वर्गखोली, Shift हे सर्व Option मागीलप्रमाणे शिक्षणाधिकारी यांच्याच लॉगिन वरून बदल करता येणार.

📌 संच मान्यता.

यावर्षीचा U-Dise Form हा सरल प्रणालीच्या माध्यमातून Generate होणार आहे. नवीन विद्यार्थ्यांच्या नोंदी, वर्गउन्नती, Attach Student, Transfer Student, Promotion या सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी Student Portal मधून Verify करावे लागणार आहेत. यानंतर केंद्रप्रमुख यांच्या लॉगीनवरून विद्यार्थी Verify होऊन गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनला जाणार आहेत.

केंद्रप्रमुख लॉगिन हे यावर्षी संच मान्यतेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार असून केंद्रप्रमुख यांच्या लॉगीनवरून संबंधित शाळेसंदर्भात केलेली प्रत्येक कृती ही त्या शाळेच्या मुख्याध्यापकास त्यांच्या लॉगीनला समजून येणार आहे.

📌 Staff Portal.

Staff Portal ला Request to Return ही Tab उपलब्ध करुन दिली जाणार असून याद्वारे शिक्षकांची माहिती परत घेऊन त्यांच्या माहितीतीतील सर्व प्रकारचे बदल उदा. नावातील बदल, आधार, पॅन इत्यादी 15 सप्टेंबर पर्यंत करता येणार आहेत.

📌 School Mapping,

School Mapping द्वारे शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनवरून सर्व शाळांचे Mapping करावे लागणार.

📌 पर्यवेक्षणीय यंत्रणा.

पर्यवेक्षणीय यंत्रणेस त्या त्या स्तरावर आपले काम पाहावे लागणार असून यात यावर्षी प्रथमच शालेय पोषण आहार अधीक्षक, त्यांचे Data Entry Operator यांचेवर त्या त्या तालुक्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

या अनुषंगाने आज एक शासननिर्णय देखील पारित झाला आहे.


- राजीव म्हसकर,शिक्षणाधिकारी(प्राथमिक), जि प नाशिक                       
[6:30 PM, 8/15/2017] Gholap Madam BEO: सरल महत्वाचे :
सूचना क्रमांक : १०८३
दिनांक : १५/०८/२०१७
(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )
प्रदीप भोसले,हवेली,पुणे

______________
♦ जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाचे♦ ______________

 सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा 🇮🇳

➡ मागील महिन्यापासून जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत संपूर्ण राज्यभर जी उलटसुटल चर्चा सुरु होती,त्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.प्रथमच होणारी ऐतिहासिक Online बदली प्रक्रियेस आज यशस्वी सुरुवात झालेली आहे.आज संवर्ग-१ साठी Online जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सोलापूर जिल्ह्यांसाठी पार पडली.अशाच प्रकारे बुधवारी १६/०८/२०१७ रोजी इतर जिल्ह्यांची संवर्ग-१ मधील कर्मचाऱ्याची बदली प्रक्रिया पार पडणार आहे.त्यानंतर लगेचच संवर्ग-२ मधील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया करण्यात येईल.सर्वाना सूचित करण्यात येत आहे की,सन २०१७-१८ मधील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया (सर्व संवर्गासाठी) दिनांक २५/०८/२०१७ पर्यंत पार पडणार असल्याने स्टाफ पोर्टल मधील आपली माहिती अचूक असेल याची काळजी घ्यावी.स्टाफ पोर्टल मधील आपली माहिती चुकीची असल्यास दुरुस्ती करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.चुकीची माहिती नमूद करून बदली प्रक्रियेत चुकीची माहिती नमूद करून दिशाभूल केल्यास  संबंधित कर्मचाऱ्यास जबाबदार धरण्यात येईल,असे ग्राम विकास मंत्रालयातून कळविण्यात आले आहे,याची नोंद घ्यावी.

➡ तसेच याच आठवड्यात संवर्ग-३ म्हणजेच अवघड क्षेत्रातील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना देखील जिल्हाअंतर्गत बदली साठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या कर्मचाऱ्यांची देखील स्टाफ पोर्टल मधील आपली माहिती वेरीफाय केलेली असेल याची त्यांनी काळजी घ्यावी.

No comments:

Post a Comment

If you have any doubts . please contact me.